Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Form PDF: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा PDF फॉर्म इथून करा डाऊनलोड!
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Form PDF Download 2024: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म नेमका कुठून डाऊनलोड करायचा याबाबत जाणून घ्या सविस्तर.
ADVERTISEMENT
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Form PDF: मुंबई: महाराष्ट्र सरकारने नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीन योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार सर्व महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत करणार आहे. राज्यातील गरीब कुटुंबांतील महिलांना ही मदत दिली जाईल. 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना महिलांसाठी दरमहा 1500 रुपये देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याची घोषणा केलीए. (how to download pdf form of mukhyamantri majhi ladki bahin yojana know exactly how and all the rules regarding scheme)
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत राज्यातील 21 वर्षे ते 65 वर्षे वयोगटातील सर्व महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दराने वार्षिक 18000 रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाईल. ही योजना जुलैपासून सुरू होईल आणि लवकरच या योजनेंतर्गत पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या महिलांना दरमहा रु. 1500 ची आर्थिक मदत मिळण्यास सुरुवात होईल. सरकारकडून या योजनेसाठी वार्षिक अर्थसंकल्पीय तरतूद 46,000 कोटी रुपये असेल.
हे ही वाचा>> Mazi Ladki Bahin Yojana : चुका टाळा! 1500 रुपये मिळवण्यासाठी कसा भरायचा अर्ज?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या १ जुलै नंतर अर्ज करू शकतील. योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यापासून 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळण्यास सुरुवात होईल. ही रक्कम लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
हे वाचलं का?
योजनेची अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने सुरू होईल. लवकरच या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया राबवण्यासाठी सरकारतर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाइट सुरू केली जाईल. मात्र, सध्या ऑफलाइन पद्धतीने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म हा आम्ही तुम्हाला pdf फॉर्मेटमध्ये उपलब्ध करून देत आहोत. पाहा हा फॉर्म करा डाऊनलोड करता येईल.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्रता निकष / CM Majhi Ladki Bahin Yojana Eligibility
1. सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दि. १ जुलै, २०२४ ते १५ जुलै, २०२४ पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत २ महिने ठेवण्यात येत असून ती दि. ३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दि. ०१ जुलै, २०२४ पासून दर माह रु.१५००/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.
ADVERTISEMENT
2. या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी १५ वर्षापूर्वीचे १. रेशन कार्ड २. मतदार ओळखपत्र ३. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ४. जन्म दाखला या ४ पैकी कोणतेहे ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहेत.
3. सदर योजनेतून ५ एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.
हे ही वाचा>> Mazi Ladki Bahin Yojana : 'त्या' प्रकारावर शिंदे संतापले, अधिकाऱी, कर्मचाऱ्यांना गंभीर इशारा
4. सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष वयोगट ऐवजी २१ ते ६५ वर्ष वयोगट करण्यात येत आहे.
5. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे १. जन्म दाखला २. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ३. आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल.
6. रु.२.५ लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येत आहे.
7. सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत...
योजनेचं नाव |
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
राज्य |
महाराष्ट्र |
योजना कोणी सुरू केली? |
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याद्वारे |
घोषणा केव्हा करण्यात आली? |
27 जून 2024 रोजी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना |
उद्देश |
महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने त्यांना आर्थिक मदत दिली जाईल. |
लाभ राशी |
1500 रुपये प्रति महिना |
लाभार्थी |
राज्यातील गरीब कुटुंबातील सर्व महिला पात्र असतील |
वयाची अट |
21 ते 65 वयोगटातील सर्व महिला |
बजेट |
46 हजार कोटी |
अर्ज कधीपासून करता येणार? |
1 जुलैपासून |
अर्जाची प्रक्रिया |
ऑनलाइन आणि ऑफलाइन |
अधिकृत वेबसाइट |
लवकरच लाँच केली जाईल |
फॉर्म - View PDF |
डाऊनलोड - View PDF |
हेल्पलाइन नंबर |
लवकरच जारी केला जाईल |
फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा - View PDF
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT