वारकऱ्यांवर ‘लाठीचार्ज’! जयंत पाटील, राऊतांचा संताप, सुप्रिया सुळेंनीही सुनावलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

lathi charge by police on varkari in alandi sanjay raut supriya sule criticize shinde fadnavis government
lathi charge by police on varkari in alandi sanjay raut supriya sule criticize shinde fadnavis government
social share
google news

Latest Marathi News : दरवर्षी आषाढी वारीनिमित्त (Ashadhi Wari) लाखो वारकरी पंढरपूरात दाखल होत असतात. यावर्षी देखील मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूरसाठी निघाले आहेत. या दरम्यान आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा सुरु असताना पोलिसांनी काही वारकऱ्यांवर लाठीचार्ज (lathi charge) केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील आता सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओचा दाखल देऊन आता विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला घेरत टीका करायला सुरुवात केली आहे. दरम्यान विरोधकांनी नेमके सरकारवर काय आरोप केले आहेत, ते जाणून घेऊयात. (lathi charge by police on varkari in alandi sanjay raut supriya sule criticize shinde fadnavis government)

ADVERTISEMENT

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या प्रकारावर सरकारवर हल्लाबोल केला आहे. वारकऱ्यांनी आज पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या आहेत, उद्या बंदुकांचा सामना करावा लागेल, आणि हे म्हणे हिंदुत्ववादी सरकार,अशा शब्दात संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली आहे. तीर्थ पर्यटन करणारे मुख्यमंत्री कुठे आहेत? हिंदू आक्रोश मोर्चा काढणारे कुठे आहेत? देवेंद्र जी आता तुम्हीच सांगा तुमच्या राज्यात औरंग्या नक्की कोणाच्या अंगात संचारला आहे? असे अनेक सवाल संजय राऊत यांनी सरकारला विचारले आहेत. तसेच हिंदूत्ववादी सरकारचे ढोंग उघडे पडले आहे, मुखवटे गळून पडले, औरंगजेब यापेक्षा वेगळे काय वागत होता? वारकऱ्यांचा हिंदू आक्रोश सरकार असा चिरडून टाकत आहे. मोगलाई महाराष्ट्रात पुन्हा अवतरली आहे,अशी टीका देखील संजय राऊत यांनी केली आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : वारकऱ्यांवरील लाठीचार्जवर देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले, ‘मविआच्या काळात…’

संजय राऊतांपाठोपाठ खासदार सु्प्रिया सुळे यांनी देखील वारकऱ्यांवर लाठीमार करणाऱ्या सरकारचा निषेध केला आहे. वारीची शेकडो वर्षांची परंपरा आहे. पण यापूर्वी कधीही वारकऱ्यांवर बळाचा वापर केल्याची घटना घडली नव्हती. जे आजवर कधीही घडले नव्हते ते यावर्षी घडले आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.तसेच माऊलींच्या दिंडी सोहळ्याला प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनामुळे गालबोट लागले आहे. दिंडीसोहळ्यासाठी आलेल्या वारकऱ्यांवर झालेला लाठी हल्ला अतिशय संतापजनक आहे. याप्रकरणी दोषी व्यक्तींची चौकशी करुन त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्राला वारीची 300 वर्षाची परंपरा आहे. या तीनशे वर्षांच्या परंपरेत प्रथमच वारीच्या पवित्र परंपरेला गालबोट लागून पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठी चार्ज केला आहे. तीनशे वर्षांमध्ये कधीही न झालेली गोष्ट शिंदे फडणवीस सरकारने करून दाखवली, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे. हिंदूत्ववादाचा डंका पिटणारे शिंदे फडणवीस सरकार ढोंगी आहे, हेच यातून सिद्ध होते, अशी टीका देखील जयंत पाटील यांनी केली.

ADVERTISEMENT

रात्रंदिवस महापुरुषांच्या विचारांचे सरकार आहे असे म्हणणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारला थोडी तरी लाज वाटते का? वारकऱ्यांवर हल्ला म्हणजे आमच्या अस्मितेवर हल्ला, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.दरम्यान आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळ्यात पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

आळंदीत लाठीमार झालेला नाही- पोलीस आयुक्त

गेल्या वर्षी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती आणि त्यावेळी काही महिला सुद्धा जखमी झाल्या होत्या. त्यामुळे यावर्षी प्रधान जिल्हा न्यायाधीश, धर्मादाय आयुक्त, मंदिर प्रमुख विश्वस्त यांच्यासोबत 3 वेळा बैठका घेऊन प्रत्येक मानाच्या पालखीतील प्रत्येकी 75 जणांना प्रवेश देण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आणि तसे नियोजन सुद्धा करण्यात आले. मानाच्या दिंडीप्रमुखांनी सुद्धा तो मान्य केला. त्यानुसार पासेस वितरित करण्यात आले होते,असे पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले.

मुख्य म्हणजे सर्व मानाच्या दिंडी प्रत्येकी 75 जणांनाच पाठवित होते. मात्र आज अचानक काही स्थानिक युवकांनी मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मंदिर विश्वस्त आणि चोपदार सुद्धा त्यांना समजावण्यासाठी आले. पण ते युवक ऐकत नव्हते. बॅरिकेड तोडून त्यांनी आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या स्थानिकांशी केवळ किरकोळ झटापट झाली, पोलिसांनी लाठीचार्ज किंवा बळाचा वापर केलेला नाही. त्यामुळे लाठीचार्ज केला, हे म्हणणे खोटे आहे. सर्व वारकरी, प्रशासनाला उत्तम सहकार्य करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची उच्च परंपरा असलेल्या वारीला उगाच गालबोट लावण्याचा प्रयत्न कुणी करू नये, ही माझी नम्र विनंती आहे, असे देखील विनयकुमार चौबे यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा : “तेव्हाच मी ठरवलं की, महाराष्ट्रातच…”, अजित पवारांनी मांडली भूमिका

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT