Lok Sabha : 38 विरुद्ध 62… प्रशांत किशोरांनी सांगितला भाजपला हरवण्याच्या फॉर्म्युला
प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीबद्दल बोलताना विरोधकांना भाजपला हरवण्याची संधी कशी आहे आणि त्यांनी काय रणनीती आखली पाहिजे याबद्दल महत्त्वाचं भाष्य केलं आहे.
ADVERTISEMENT

Prashant Kishor Lok Sabha 2024 Election Prediction : देशात लोकसभा निवडणुकीचं वातावरण तयार झालं आहे. भाजपने 400 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवलं आहे, तर काँग्रेसने इंडिया आघाडी स्थापन केली आहे. असं असलं तरी एक चर्चा सातत्याने होताना दिसतेय की, विरोधकांना भाजपला हरवण्याची संधी आहे का? या प्रश्नाचं उत्तर देताना राजकीय रणनीतीकार आणि जनसुराज अभियानाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी एक गणित मांडलं आहे.
प्रशांत किशोर यांनी इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी दैनिकाला मुलाखत दिली. या मुलाखतीत प्रशांत किशोर यांनी पंतप्रधान मोदी अजिंक्य नाही, असे सांगतानाच विरोधकांना त्यांना पराभूत करण्यासाठी संधी मिळाली होती. पण, त्यांनी ती साधली नाही, असेही सांगितले.
मोदी अजिंक्य नाही -प्रशांत किशोर
“मोदी अजिंक्य नाही. 2014 मध्ये मोदी सत्तेत आल्यानंतर त्यांना हरवण्यासाठी विरोधकांना अनेकदा संधी मिळाली, पण त्यांनी ती साधली नाही. 2015 मध्ये बिहारमधील निवडणुकीत भाजपचा पराभव, 2016 मध्ये नोटबंदीनंतरची संधी, 2018 मध्ये निवडणुकीत भाजपचा पराभव. विरोधकांनी प्रयत्न केले असते, तर भाजप बॅकफूटवर गेली असती. पण, असं घडलं नाही आणि भाजपला पुन्हा परतण्याची संधी मिळाली”, असे किशोर म्हणाले.
हेही वाचा >> सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवारांनी फुंकले रणशिंग; केली मोठी घोषणा
प्रशांत किशोर असंही म्हणाले की, “भाजपच्या विजयामुळे विरोधकांना सतत संघर्ष करावा लागेल, असं समजणं चुकीचं आहे. भारतात विरोधकांना कमकुवत समजलं जाऊ शकत नाही. विरोधातील पक्ष किंवा ते पक्ष कमकुवत होऊ शकतात, पण भारतात विरोधक कमजोर झालेले नाही”, असे मत त्यांनी मांडले.