Gajanan Kirtikar : 'शिवसेना भाजपच्या दावणीला बांधलेली चालणार नाही', शिंदेंच्या खासदाराची टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

महायुतीतील भाजप 32, शिवसेना 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 4 जागा लढवणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र या कथित जागावाटपावर आता शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर (gajanan kirtikar) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
lok sabha election 2024 seat sharing bjp shivsena shinde ajit pawar ncp gajanan kirtikar maha vikas aghadi maharashtra politics
social share
google news

Lok Sabha Election 2024, Shiv Sena Shinde vs BJP : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची चर्चा आहे. महायुतीतील भाजप 32, शिवसेना 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 4 जागा लढवणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र या कथित जागावाटपावर आता शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर (gajanan kirtikar) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर कीर्तिकर यांनी शिवसेना भाजपच्या दावणीला बांधलेली आम्हाला चालणार नाही,अशी टीका देखील केली आहे.  (lok sabha election 2024 seat sharing bjp shivsena shinde ajit pawar ncp gajanan kirtikar maha vikas aghadi maharashtra politics) 

हा जो फॉर्म्युला तयार केला गेला आहे. त्याची अधिकृत घोषणा झाली नाही आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. हे जे आकडे आहेत 32, 12, 4 याला काहीच बेस नाही आहे. चर्चा कोण करतंय? निर्णय कोण घेतंय? शिवसेना, राष्ट्रवादीची प्रमुख माणसे आहेत, ते चर्चा करतायत काय? ते आम्हाला माहिती नाही. शिवसेनेची भूमिका ठरवताना मुख्य नेते यावर सहाजिक चर्चा करतील अशी अपेक्षा आहे, असे गजानन कीर्तिकर यांनी सांगितले.

हे ही वाचा : उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीवर शिक्कामोर्तब! काँग्रेस किती जागा लढवणार?

तसेच जागावाटपातील 12 जागांचा फॉर्म्युला आम्हाला अजिबात मान्य नाही. कारण आमचा 2019 चा दावा हा 22 जागांचा होता, तर भाजप 26  जागांवर लढली होती. भाजपचे त्यावेळेस तीन उमेदवार हरले होते आणि 23  निवडून आले  होते. तर शिवसेनेचे 22 पैकी 4 उमेदवार हरले म्हणजे 18 निवडून आले होते. पण आता महायुतीत अजित पवारांच्या रूपात तिसरा पार्टनर आला आहे. त्यांना सुद्धा जागा द्याव्या लागणार आहेत. त्यामुळे शिवसेना आणि भाजप दोघांनीही आपापल्या कोट्यातून राष्ट्रवादीसाठी जागा सोडणं अपेक्षित आहे, एकट्या शिवसेनेनं नाही. त्यामुळे 12 जागांवर बोळवण करणं आम्हाला मान्य नाही. शिवसेना भाजपच्या दावणीला बांधलेली आम्हाला चालणार नाही, अशी भूमिका गजानन कीर्तिकर यांनी मांडली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सुनील तटकरे काय म्हणाले? 

महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, मुख्यमंत्री, दोन्ही उप मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांची एकत्रित बैठक होईल. त्यानंतर दिल्ली येथे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक होऊन मग लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप ठरेल, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. 

हे ही वाचा : खळबळजनक.. कल्याण रेल्वे स्थानकात सापडली 54 स्फोटकं!

    follow whatsapp

    ADVERTISEMENT