‘एका जाहिरातीने…’, एकनाथ शिंदेंसमोर देवेंद्र फडणवीस ‘त्या’ जाहिरातीवर काय बोलले?
एखाद्या जाहिरातीमुळे किंवा एखाद्याच्या वक्तव्यामुळे हे सरकार पडेल असे अनेकांना वाटले होते.मात्र हे सरकार तकलादू नाही आहे. हे जुने सरकार नाही आहे,अशा शब्दात उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहिरात नाट्यावर मौन सोडले आहे.
ADVERTISEMENT
Maharashtra politics news : एखाद्या जाहिरातीमुळे किंवा एखाद्याच्या वक्तव्यामुळे हे सरकार पडेल असे अनेकांना वाटले होते.मात्र हे सरकार तकलादू नाही आहे. हे जुने सरकार नाही आहे,अशा शब्दात उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहिरात नाट्यावर मौन सोडले आहे. तसेच आम्ही खुर्च्या तोडण्यासाठी किंवा पद मिळविण्यासाठी हे सरकार आणलं नाही, तर सर्वसामान्यांच्या जीवनात गुणात्मक बदल करण्यासाठी हे सरकार आणल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. (maharashtra ad controversy what did devendra fadnavis say about ‘that’ advertisement in front of eknath shinde)
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीस पालघरमध्ये आयोजित शासन आपल्या दारी या कार्यक्रमात बोलत होते. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात जाहिरबाजी सुरु आहे. या जाहिरातीत देवेंद्र फडणवीसांपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्रात लोकप्रियता जास्त असल्याचे सांगण्यात आले होते. या जाहिरातीवरून भाजपच्या इतर नेत्यांनी आक्षेप घेतला होता. तर देवेंद्र फडणवीसांनी अनेक दिवसांपासून मौन बाळगले होते. मात्र आजच्या कार्यक्रमात त्यांनी या जाहिरात नाट्यावर उत्तर दिले आहे.
हे ही वाचा : CM शिंदेंनी खुणावलं… फडणवीसांनी तिथेच दिला नकार, नेमकं काय घडलं?
देवेंद्र फडणवीस यांनी भाषणाची सुरुवातच महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशी केली. पुढे ते जाहिरात वादावर बोलताना म्हणाले, एखाद्या जाहिरातीमुळे किंवा एखाद्याच्या वक्तव्यामुळे कुठे हे सरकार पडेल असे अनेकांना वाटले होते. हे सरकार तकलादू नाही आहे, असे स्पष्ट उत्तर फडणवीस यांनी दिले. तसेच हे जुने सरकार नाही आहे, कोणी आधी भाषण करायचं आणि कोणी नंतर भाषण करायचं. याच्याकरता एकमेकांची गच्ची पकडणारे आम्ही बघितले, अशी टीका फडणवीसांनी विरोधकांवर केली होती.तसेच आम्ही खुर्च्या तोडण्यासाठी किंवा पद मिळवण्यासाठी हे सरकार तयार केले नाही, तर सर्वसामान्यांच्या जीवनात गुणात्मक बदल घडविण्यासाठी हे सरकार अस्तित्वात आले आहे, असे देखील फडणवीस म्हणाले आहेत.
हे वाचलं का?
राज्यातील दोन सरकारमधला फरक सांगताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात वर्षभरात सरकार बदललं. पण मागच सरकार होतं, सरकार आपल्या घरी, तर आताच सरकार तुमच्या दारी.एक सरकार स्वत:च घरी बसल होतं आणि हे सरकार तुमच्या दारी येऊन, तुमचे अधिकार लाभ, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करतेय, असा टोला देखील फडणवीस यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला.आमचा 25 वर्षाचा एकत्रित प्रवास आहे, पण गेल्या वर्षभरात तो आणखीण घट्ट झाला आहे. त्यामुळे आमच्या प्रवासाची चिंता करण्याचे काही कारण नाही आहे. आमचा प्रवास कालही सोबत होता, आजही सोबत आहे आणि उद्याही सोबत राहणार आहे, असा विश्वास देखील देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
हे ही वाचा :Maharashtra politics : युतीतील संघर्षाची धग कायम! भाजपचा शिवसेनेवर पलटवार
पंतप्रधान मोदींनी 9 वर्षात जो बदल केला, त्यामुळे या देशाची वितरण व्यवस्था बदलली. वितरण व्यवस्थेमध्ये लाभार्थ्याला लाभ घ्यायचा असेल, तर कोणाला तरी लाभ द्यावा लागायचा, मग त्याला लाभ मिळायचा. पण आता पंतप्रधान मोदींनी सांगितले, लाभार्थ्यांमध्ये लाभ स्वता पोहोचेल, मध्ये कोणी राहणार नाही, कोणी दलाली करणार नाही. आता लाभ थेट लाभार्थ्यापर्य़ंत पोहोचण्याची व्यवस्था मोदींनी केली आहे. आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वाखाली आम्ही हेच ठरवले असल्याचे देखील फडणवीस म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आतापर्यंत दीड लाखापर्यंत मोफत उपचार देत होतो, आता 5 लाखापर्यतं मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आदिवासी आणि एससींसाठी 5 लाख घरं बांधणार असून एकही आदिवासी बेघर राहू देणार नाही. ओबीसींसाठी 10 लाख घरे बांधणार असून पालघर, ठाणे जिल्ह्यातील ओबीसींना घरे देण्याचा निर्णय घेणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT