Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'या' तीन कारणांमुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लांबणीवर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Maharashtra-assembly-elections-2024 election-commission-announced-jammu-kashmir-haryana-election-date rajiv kumar
'या' कारणांमुळे महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लांबणार
social share
google news

बातम्या हायलाइट

point

जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभेच्या तारखा जाहीर

point

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लांबणीवर

point

निवडणूक आयुक्तांनी सांगितली 3 कारणे

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर (Jammu Kashir) आणि हरियाणा (Haryana) विधानसभेच्या तारखा (Assembly Election 2024) जाहीर केल्या आहेत. त्यानुसार जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यात आणि हरियाणामध्ये 1 टप्प्यात 1 ऑक्टोबरला मतदान पार पडणार आहे. तर या निवडणुकीचा निकाल 4 ऑक्टोबरला जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी दिली आहे. राजीव कुमार यांनी यावेळी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर न करण्यामागची कारणेही सांगितली आहेत.( maharashtra-assembly-elections-2024 election-commission-announced-jammu-kashmir-haryana-election-date rajiv kumar) 

ADVERTISEMENT

इंडिया टूडे आणि आजतकचे पत्रकार संजय शर्मा यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर सवाल केला होता. यावर राजीव कुमार म्हणाले,  महाराष्ट्र आणि हरियाणा यापूर्वी एकत्र होते. तेव्हा जम्मू-काश्मीर अस्तित्वात नव्हते. पण आता ते अस्तित्वात आले आहे. तसेच जम्मू-काश्मीर  आणि हरियाणा या दोन्ही राज्यात सुरक्षा दलांची उपलब्धता आणि हालचाली लक्षात घेऊन दोन राज्यांमध्ये एकाचवेळी निवडणुका घेण्याचे आमचे लक्ष्य आहे, असे राजीव कुमार यांनी सांगितले. 

हे ही वाचा :Uddhav Thackeray : "आयएएस ऑफिसर म्हणताहेत, साहेब लवकर या", ठाकरे मेळाव्यात काय बोलले?

महाराष्ट्रात सध्या मान्सून सूरू आहे. मतदार यादीचे काम देखील बाकी आहे. तसेच पितृ पक्ष, गणेश चतुर्थी,दिवाळी, नवरात्री इत्यादी सण असल्या कारणाने निवडणूक पूढे घेण्यात येणार असल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले आहे. तसेच विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या सहा महिने आधी पुढील निवडणुका होऊ शकतात, असा विशेषाधिकार आयोगाला आहे, असे देखील राजीव कुमार म्हणाले आहेत. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Sanjay Raut: महाराष्ट्राची लाडकी बहीण कोण? संजय राऊतांनी मविआच्या मेळाव्यात थेट नावच सांगितलं

निवडणूक आयोगाने शुक्रवारी 16 ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीर आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. जम्मू-काश्मीरमध्ये 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर आणि हरियाणामध्ये 1 ऑक्टोबरला तीन टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. 4 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.

दरम्यान 2014 पासून जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका झालेल्या नाहीत. 2019 मध्ये 370 हटवल्यानंतर येथे राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. आता जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकीकडे जनतेचे लक्ष लागून आहे. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT