Badlapur News: 'शिवाजी महाराजांनी आरोपीचे हात काढून घेतलेले', शरद पवारांचा प्रचंड संताप
Sharad Pawar on Badlapur Case: तोंडावर काळी पट्टी बांधून स्वत: शरद पवार हे बदलापूर घटनेच्या निषेध करण्यासाठी आज पुण्यात निदर्शन करताना दिसून आले..
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
शरद पवार काळी फित बांधून उतरले आंदोलनात
बदलापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
पाहा शरद पवारांनी काय केली मागणी?
Sharad Pawar: पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (SP)अध्यक्ष शरद पवार यांनी बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलनात भाग घेतला यावेळी त्यांनी जनतेला शपथ दिली आणि जाहीर सभेला संबोधित केले. शरद पवार म्हणाले, "आम्ही येथे एका दुःखद आणि चिंताजनक घटनेच्या विरोधात एकत्र आलो आहोत. आता महाराष्ट्रात असा एकही दिवस जात नाही की, जेव्हा महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या ऐकायला मिळत नाहीत. हे तेच राज्य आहे, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर अशी काही घटना आली की, महाराज ताबडतोब कडक कारवाई करत आरोपीचे हात कापून टाकायचे. (maharashtra bandh badlapur news shivaji maharaj had cut off hands of accused by sharad pawar huge anger over badlapur case)
पुण्यात आंदोलनात सहभागी झालेले शरद पवार यांनी या संपूर्ण घटनेबाबत बोलताना म्हटलं की, 'हे राज्य शिवछत्रपतींचे राज्य आहे. या राज्यात एका मुलीवर अत्याचार झाले. त्यावेळी असं झाल्यानंतर महाराजांनी त्यावेळीच आरोपीचे हात काढून त्यांना शिक्षा दिली होती. आज जे काही घडलं त्याची गांभीर्याने दखल सरकारने घेतली पाहिजे.'
हे ही वाचा>> Maharashtra Bandh : "नराधमाला पाठिशी घालणारं विकृत सरकार..."; भर पावसात उद्धव ठाकरे संतापले
'बदलापूरचा प्रकरणांमध्ये विरोधक राजकारण आणतात असं हे म्हणतात आता मुलींच्या प्रकरणांमध्ये विरोधक राजकारण आणतात असं तुम्ही म्हणत आहात यावरून राज्यकर्ते किती असंवेदनशील आहेत हे दिसतंय.' असं म्हणत पवारांनी सरकारवरच टीका केली.
सुप्रिया सुळेंनीही चढवला सरकारवर हल्ला
बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आयोजित आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, "बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना अधिकार दिले आहेत, मात्र राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. काही घटनांची पुनरावृत्ती होत आहे. काही घटनांमध्ये पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याचे समोर आले आहे, आणि गुन्हेगारांमध्ये आता पोलिसां भीतीचं वातावरण नाही. पुण्यात आता ड्रग्ज आणि कोयता गँगसारख्या अनेक घटना घडल्या आहेत, त्या पाहता मी अशा घटनांचा तीव्र निषेध करतो.'










