Opinion Poll 2024 : शिंदे-पवारांची साथ… भाजपवरच ‘बुमरँग’! ओपिनियन पोलचा अर्थ काय?
उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांची ताकद कमी झाल्याचे म्हटले जात आहे. त्याचा परिणाम महाविकास आघाडीच्या जागांवर होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, ओपिनियन पोलमध्ये महाविकास आघाडीची मतांची टक्केवारी वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
Opinion Poll 2024 Lok Sabha Election Maharashtra : 2014 पासून केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आहे. या सरकारला मे महिन्यात दहा वर्ष पू्र्ण होतील. पण, सध्या चर्चा आहे ती मोदी सरकार हॅटट्रिक करणार की, इंडिया आघाडी राजकीय चमत्कार घडवणार? भाजप प्रणित एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडी सध्या लोकसभेच्या तयारीत मग्न आहे. अशातच एका सर्वेक्षणाचे आकडे समोर आले, ज्याने उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्रात भाजपचं टेन्शन वाढवलं आहे. 2019 नंतर महाराष्ट्रात दोन मोठे राजकीय भूकंप झाले. त्यामुळे महाविकास आघाडीची ताकद कमी झाल्याचे म्हटले जात होते. मात्र, नव्या ओपिनियन पोलचे आकडे वेगळेच चित्र दाखवत आहेत. ते नेमकं काय आहे आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेणे भाजपवरच बुमरँग होतंय का, हेच समजून घेऊयात…
ADVERTISEMENT
महाराष्ट्रा दोन भूकंप
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार होते. विधान परिषदेची निवडणूक पार पडली आणि 20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले. त्यानंतर ते महाराष्ट्रात परतले आणि मुख्यमंत्री झाले. शिवसेनेतील बंड उद्धव ठाकरेचं नव्हे तर महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का होता. त्यामुळे महाविकास आघाडीची ताकद कमी झाल्याचे म्हटले जाऊ लागले.
हेही वाचा >> Opinion Poll 2024 Maharashtra : राऊतांनी सांगितलं ‘मविआ’चं लोकसभेचं टार्गेट
शिवसेनेतील बंड झाले. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदेंच्या गटाला मिळालं. म्हणजे शिवसेना भाजपसोबत असल्याचे शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर महाविकास आघाडीने वज्रमूठ सभा घेऊन शक्तिप्रदर्शन सुरू केले. काही सभा झाल्यानंतर महाविकास आघाडीची ताकद कायम असल्याचे राजकीय विश्लेषक म्हणून लागले. पण, त्यानंतर 2 जुलै 2023 रोजी म्हणजे शिंदेंच्या बंडानंतर वर्षभराने अजित पवारांनी बंड केले. राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गट भाजपसोबत गेला आणि सत्तेत सहभागी झाला.
हे वाचलं का?
भाजपची ताकद वाढली
एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आल्यामुळे भाजपची ताकद वाढली होती. इंडिया टुडे मूड ऑफ द नेशनच्या सर्वेक्षणात हे दिसून आलं होतं. कारण अजित पवारांचं बंड होण्यापूर्वी म्हणजे 26 जानेवारी 2023 रोजी समोर आलेल्या मूड ऑफ द नेशनच्या अंदाजानुसार त्यावेळी लोकसभेच्या निवडणूक झाली, तर महाविकास आघाडीला 34 जागा मिळतील, तर एनडीएला 14 जागा मिळतील असं म्हटलेलं होतं.
हेही वाचा >> Lok Sabha Opinion Poll 2024 : महाराष्ट्रात मविआ, उत्तर प्रदेशसह पाच राज्यात भाजपचं काय?
अजित पवारांच्या बंडानंतर जागांचे हे अंदाज एकदमच बदलले ऑगस्ट 2023 रोजी मूड ऑफ द नेशनचे आकडे समोर आले होते. सर्वेक्षणाच्या आधारे त्यात असा अंदाज व्यक्त केलेला होता की, त्यावेळी लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर एनडीएला 20 जागा, तर महाविकास आघाडीला 28 जागा मिळतील. पण, आता सी व्होटरच्या सर्वेक्षणाने शिंदे-पवारांची साथ भाजपला फायदेशीर ठरत नसल्याचे समोर आले आहे.
ADVERTISEMENT
सी व्होटर ओपिनियन पोलचं भाजपला टेन्शन
उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहे. उत्तर प्रदेशात 80 जागा आहेत, तर महाराष्ट्रात 48 जागा आहेत. याच 48 जागासंदर्भात सी व्होटरने ओपिनियन पोल केला. त्यात असं म्हटलं आहे की, आता (डिसेंबर 2023) लोकसभेच्या निवडणूक झाली, तर महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळू शकतात.
ADVERTISEMENT
48 पैक 26 ते 28 जागा महाविकास आघाडीला मिळू शकतात, तर 19 ते 21 जागा भाजप प्रणित एनडीएला मिळेल असे म्हटले आहे. इतरांना 0 ते 2 जागा मिळू शकतात.
भाजप कुठे?
मागील काळात झालेले ओपिनियन पोल आणि आता प्रसिद्ध झालेला सी व्होटरचा ओपिनियन पोलचे आकडे बघितल्यास भाजपची ताकद कमी होताना दिसत आहे. मूड ऑफ द नेशनमध्ये भाजपला 20 जागा मिळतील असा अंदाज होता. नव्या ओपिनियन पोलमध्येही भाजप त्याच ठिकाणी आहे. भाजपकडून लोकसभेच्या 45 पेक्षा जास्त जाग जिंकण्याचे दावे केले जात आहे.
हेही वाचा >> Maharashtra Opinion Poll 2024 : मविआला लोकसभेच्या 28 जागा, महायुतीची झोप उडवणारा पोल!
एकनाथ शिंदे यांची शिवसेना सोबत आल्यानंतर भाजप 14 जागा जिंकेल असे अंदाज व्यक्त केले होते. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर हा भाजपच्या जागा वाढतील असे अंदाज समोर आले. ते 20 वर आले, पण चार महिन्यानंतर समोर आलेल्या ओपिनियन पोलमध्ये भाजपच्या वाट्याच्या जागा होत्या तितक्याच दाखवत आहेत. त्यामुळे शिंदेंच्या सेनेची ताकद किती असा प्रश्नही यानिमित्ताने समोर आला आहे. त्याचबरोबर भाजपवर शिंदे-पवारांची साथ बुमरँग होतेय का असे प्रश्न समोर उपस्थित होताहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT