Maharashtra New CM: शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला, पण मोदी-शाह पुन्हा वापरणार धक्कातंत्र?

रोहित गोळे

एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला आहे. मात्र, असं असलं तरी शेवटच्या क्षणी पंतप्रधान मोदी आणि अमित शाहा हे धक्कातंत्राचा वापर करू शकतात.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला

point

देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार?

point

मोदी-शाह पुन्हा वापरणार धक्कातंत्र?

Eknath Shinde: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड मोठं यश मिळालं. त्यामुळे महाराष्ट्रात आता भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा अशी मागणी जोरकसपणे लावून धरण्यात आली होती. पण हा विजय एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात मिळाला आहे त्यामुळे त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावं अशी मागणी त्यांच्या पक्षाकडून सुरू होती. त्यामुळेच मागील तीन दिवसांपासून मुख्यमंत्री पदाबाबत खल सुरू होता. अखेर आज (27 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे यांनी आपला मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला आहे. मात्र, असं असलं तरी मुख्यमंत्री पदाचा अंतिम निर्णय हा मोदी-शाह हेच घेणार आहेत. (maharashtra new cm eknath shinde has given up his claim to the post of chief minister but will modi shah use shock tactics again)

मोदी-शाह पुन्हा वापरणार धक्कातंत्र?

महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदेंनी एक नवा अध्याय रचला होता. ज्यानंतर त्यांना मुख्यमंत्री पद देऊन भाजपने नवी खेळी केली होती. मात्र, आता निकालानंतर सगळी समीकरणं बदलून गेली आहेत. अशावेळी एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडून दिला आहे. तसेच मोदी-शाह जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असंही ते यावेळी म्हणाले. 

दरम्यान, अमित शाह हे उद्या महायुतीच्या तीनही नेत्यांसोबत बैठक करणार असून त्यानंतर मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय हा जाहीर केला जाईल. 

हे ही वाचा>> Eknath Shinde Press conference : 'मी मोदी-शाहांना फोन केला...',मुख्यमंत्री पदाबाबत शिंदेंकडून प्रचंड मोठा निर्णय

मात्र, असं असलं तरीही मोदी-शाह ही जोडगोळी राजकीय धक्कातंत्र वापरण्यात अत्यंत कुशल आहे. त्यांनी आतापर्यंत अनेकांचे अंदाज चुकवत आपल्या राजकीय खेळी खेळल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील येथे झालेल्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालं होतं. तेव्हा तेथील प्रस्थापितांना बाजूला सारत मोदी-शाह यांनी नवख्या नेत्यांना थेट मुख्यमंत्री पद देऊ केलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp