मोठी बातमी: नगर परिषद, नगर पंचायतींची मतमोजणी उद्या नाही, तर... हायकोर्टाचा सर्वात मोठा निर्णय!

मुंबई तक

Maharashtra Politics : मोठी बातमी: नगर परिषद, नगर पंचायतींची मतमोजणी उद्या नाही, तर... हायकोर्टाचा सर्वात मोठा निर्णय!

ADVERTISEMENT

maharashtra politics
maharashtra politics
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मोठी बातमी: नगर परिषद, नगर पंचायतींची मतमोजणी उद्या होणार नाही

point

नागपूर हायकोर्टाचा सर्वात मोठा निर्णय!

Maharashtra Politics : मुंबई: राज्यातील 264 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज (2 डिसेंबर) मतदान सुरू आहे. मात्र, या निवडणुकीच्या निकालाबाबत नागपूर खंडपीठाने सर्वात मोठा निर्णय दिलाय. हायकोर्टाने उद्या होणारी मतमोजणी पुढे ढकलली आहे. आता मतमोजणी 21 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. त्यामुळे तुमचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक कोण होणार? हे 21 डिसेंबर रोजी समजणार आहे.

आज ज्या ठिकाणी मतदान सुरु आहे, त्याठिकाणची मतमोजणी उद्या होऊ शकणार नाही, असं नागूपर खंडपीठाने स्पष्ट केलं आहे. निवडणूक पारदर्शक राहिली पाहिजे. उद्या मतमोजणी झाल्यास त्याच्या पारदर्शकतेवर परिणाम होऊ शकतो, असं न्यायालयाने नमूद केलंय. सध्या जे मतदान सुरु आहे, ते सुरु राहुद्या. मात्र, त्याचा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर करा, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं.

सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत. तसं झाली नाही तर 20 नगरपरिषदांच्या निकालावर प्रभाव पडू शकतो, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. दरम्यान, याबाबतचा सर्व युक्तिवाद झाल्यानंतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे 21 डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा : संतोष बांगरांनी सर्व नियम मोडले, मतदान केंद्रावर फोनवर गप्पा, बटण दाबण्यास सांगितलं अन् घोषणाबाजी VIDEO

हे वाचलं का?

    follow whatsapp