Chandrashekhar Bawankule: “शरद पवारांनी षडयंत्र सुरू केले आहे, कारण…”

मुंबई तक

ADVERTISEMENT

chandrashekhar bawankule claim that sharad pawar oppose to aurangabad rename.
chandrashekhar bawankule claim that sharad pawar oppose to aurangabad rename.
social share
google news

Maharashtra Politics Latest News : लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्ष जोरात कामाला लागले असून, सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडताना दिसत आहेत. असाच गंभीर आरोप नांदेड येथे झालेल्या सभेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. नामांतराच्या मुद्द्यावरूनही बावनकुळे यांनी मोठा दावा केला. (current political situation in Maharashtra 2023)

ADVERTISEMENT

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह यांची नांदेड येथे शनिवारी (10 जून) सभा झाली. या सभेत बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही मुद्द्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केले.

छत्रपती संभाजीनगरला पवारांचा विरोध -बावनकुळे

या सभेत बोलताना बावनकुळेंनी असा दावा केला की, “औरंगाबादला संभाजीनगर, उस्मानाबादला धाराशिव आणि परवा अहमदनगरला अहिल्यानगर नाव देऊ असा विचार केला नव्हता. शरद पवार आणि अजित पवारांनी म्हटलं आहे की, आम्ही कधीही संभाजीनगर म्हणणार नाही. आम्ही औरंगाबादच म्हणू, हे शरद पवार म्हणतात.”

हे वाचलं का?

“शरद पवारांची ‘पावर’ संपली”

बावनकुळे म्हणाले, “महाराष्ट्रातील राजकारण दंगलीत बदलण्याचं काम विरोधक करत आहे. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांनी राजेशाही थाटात चालणाऱ्या लोकांना रस्त्यावर आणलं आहे आणि शरद पवारांची तर पावरच संपली आहे. ज्या पक्षाची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता गेली, त्या पक्षाचा वर्धापन दिन आहे”, असा टोला बावनकुळेंनी यावेळी लगावला.

हेही वाचा >> Chavadi Impact: संजय राऊत म्हणाले शिवसेना शाहांनी फोडली, गृहमंत्री म्हणाले सेना तर…

“देवेंद्रजींना बदनाम करण्यासाठी शरद पवारांनी षडयंत्र सुरू केले आहेत. शरद पवार ज्या ज्या वेळी सरकारमधून बाहेर गेले, तेव्हा तेव्हा त्यांना ओबीसी दिसतो. त्यांना मराठा आरक्षण दिसते. त्यांना धनगर आरक्षण दिसते. आता त्यांनी चिंता व्यक्ती केली ती मुस्लिम आणि ख्रिश्चनांची”, असं बावनकुळेंनी म्हटलं.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> “संजय राऊत आणि तुला गोळ्या घालणार, एका महिन्यात स्मशानात पाठवणार”

“मुस्लिम, ख्रिश्चनांचं काय होईल, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. अरे बाबा, पाच वर्षे देवेंद्रजींनी, मोदींनी एकही मुस्लिमांचं दंगा करण्याचं काम मागच्या सरकारमध्ये झालं नाही. पण, शरद पवार सरकारमधून बाहेर गेल्याबरोबर या महाराष्ट्राला पेटवण्याचं आणि देवेंद्रजींना बदनाम करण्याचे काम करताहेत”, असा गंभीर आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT