Uddhav Thackeray : “…तर अजित पवार कोणत्याच चिन्हावर निवडणूक लढवू शकणार नाहीत”

भागवत हिरेकर

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंनी सामना अग्रलेखातून पुन्हा एकदा भाजपसोबत गेलेल्या एकनाथ शिंदे, अजित पवारांना लक्ष्य केले आहे. काही सवाल ठाकरेंनी उपस्थित केले आहेत.

ADVERTISEMENT

uddhav thackeray slams to ajit pawar
uddhav thackeray slams to ajit pawar
social share
google news

Ajit Pawar Uddhav Thackeray Maharashtra elections 2024 : महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यातच हिवाळी अधिवेशनादरम्यान एक माहिती समोर आली, ती भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीची. भाजपने स्वबळावर लढावे, असा निर्णय संघाने घेतल्याच्या वृत्ताने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. याच मुद्द्यावरून ठाकरेंनी सामनात ‘मंबाजी, तुंबाजी व कमळाबाई’ अग्रलेख लिहून शिंदे-पवारांसोबत भाजपला टोले लगावले आहेत.

ठाकरेंच्या शिवसेनेने अग्रलेखात म्हटले आहे की, “भारतीय जनता पक्ष हा हिंदुत्ववादी, त्यांच्याबरोबरचा शिंदे गट हा बोगस हिंदुत्ववादी अशा दोघांच्या कात्रीत अजित पवारांचा धर्मनिरपेक्षवादी गट अडकला आहे. शिंदे गटाने व अजित गटाने कोणत्या चिन्हावर लढायचे हे दिल्लीतील भाजप हायकमांड ठरवणार आहे. मुळात कलंकित चेहऱ्यांना, ‘मिरची’ छाप व्यापाऱ्यांना उमेदवारी देऊ नये, असे फर्मान सुटले तर शिंदे व अजित गटातील 90 टक्के लोक बाद होतील. स्वतः अजित पवार हे कोणत्याच चिन्हावर निवडणूक लढवू शकणार नाहीत”, असं मोठं विधान ठाकरेंनी केलं आहे.

“भाजप व त्यांच्या सोबतच्या दोन्ही गटांत आताच धुसफूस सुरू झाली आहे. कलंकित लोकांना उमेदवाऱ्या मिळू नयेत व मिळाल्याच तर आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही, अशी भाजपच्या प्रमुख मंडळींची भूमिका आहे असे वृत्त संघ परिवारानेच सोडले आहे”, असे म्हणत ठाकरेंनी भाजप, शिंदे आणि अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादीच्या चिन्हाचा निकाल लागायचा आहे, पण…

“प्रश्न राहिला चिन्हाचा. ‘धनुष्यबाण’ हे पवित्र चिन्ह निवडणूक आयोगाने फुटीर गटास दिले व त्याबाबतचा खटला सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. राष्ट्रवादीबाबतचा चिन्हाचा निकाल लागायचा आहे, पण पक्ष फोडताना सध्याचे दिल्लीश्वर फुटीर नेत्यांच्या हाती मूळ पक्षाचे चिन्ह बिदागी म्हणून ठेवतात. त्यामुळे घड्याळावर किंवा धनुष्यबाणावर लढणार असे हे लोक सांगतात. घड्याळावर लढा किंवा धनुष्यबाणावर लढा, जनता फुटिरांना समर्थन देणार नाही हे महाराष्ट्राचे जनमानस आहे”, अशा शब्दात ठाकरेंनी महायुतीतील पक्षांना सुनावलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp