‘सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकरांचा पुतळा हटवला’, नव्या वादाला फुटलं तोंड
महाराष्ट्र सदनातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटवण्यात आल्याचा प्रकार समोर आला.
ADVERTISEMENT
वि.दा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमसाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटवण्यात आल्याच्या मुद्द्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात हा प्रकार झाल्याचे फोटो शेअर करत विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी तर नेहमी गोंधळ घालणारे बोलघेवडे चॉकलेट बॉय आता गप्प का? असा टोला यावरून लगावला आहे.
ADVERTISEMENT
प्रकरण नेमकं काय?
विनायक दामोदर सावरकर यांची जयंती रविवारी साजरी करण्यात आली. यानिमित्ताने दिल्लीतील महाराष्ट्र सदनात अभिवादनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र सदनातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटवण्यात आल्याचा प्रकार समोर आला. याबद्दलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
बोलघेवडे चॉकलेट बॉय गप्प का? रोहित पवारांचा सवाल
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी यावरून टीका केली आहे. रोहित पवारांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे असलेला आणि हटवल्यानंतरचे फोटो शेअर केले आहेत.
हे वाचलं का?
हेही वाचा >> kandivali murder : आला अन् तरुणाला घातली गोळी, कांदिवलीत भरदिवसा थरार
रोहित पवारांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “महाराष्ट्र सदनात सावरकरांची जयंती साजरी करण्यासाठी न्यायाची स्थापना करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोन्ही विश्वव्यापी कर्तृत्वांचे पुतळे हटवून अपमान करणे महाराष्ट्र शासनास शोभणारे नाही.”
ADVERTISEMENT
रोहित पवारांनी पुढे असंही म्हटलं आहे की, “हे करत असताना सर्वसामान्यांचा अभिमान असणारी महाराष्ट्र शासनाची मुद्रा झाकली जात आहे. याचे भान देखील सरकारला राहिले नाही. नेहमी गोंधळ घालणारे बोलघेवडे #chocklate_boy (चॉकलेट बॉय) आता गप्प का? या घटनेचा निषेध करण्याची हिम्मत दाखवतील का?”
ADVERTISEMENT
महाराष्ट्र सदनात सावरकरांची जयंती साजरी करण्यासाठी न्यायाची स्थापना करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोन्ही विश्वव्यापी कर्तृत्वांचे पुतळे हटवून अपमान करणे महाराष्ट्र शासनास शोभणारे नाही. हे करत… pic.twitter.com/da8J6VGGpr
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 28, 2023
इतिहास नाकारण्याची मानसिकता, चाकणकरांची टीका
रोहित पवारांबरोबरच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनीही टीका केली आहे. “आज दिल्लीमधील महाराष्ट्र सदन येथे विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता.यावेळी तेथून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हटविण्याचे दुष्कृत्य करण्यात आले आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची देखील उपस्थिती होती.”
आज दिल्लीमधील महाराष्ट्र सदन येथे विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता.यावेळी तेथून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हटविण्याचे दुष्कृत्य करण्यात आले आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे…
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) May 28, 2023
हेही वाचा >> अखंड भारताचा नकाशा, मोर, कमळ अन्… नवीन संसद भवनात काय आहे खास?
“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती ही अवघ्या तीन दिवसांवर आली असताना देशामध्ये स्त्री सन्मानाच्या चळवळीच्या अग्रस्थानी असलेल्या या दोन महान विभूतींचा हा अपमान आहे,त्यांचं अस्तित्व आणि त्यांचा दैदिप्यमान इतिहास नाकारण्याची मानसिकता उघड करत आहे. घडलेल्या प्रकाराची राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी”, अशी टीका चाकणकर यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT