Mahayuti : अमित शाहांकडून शिंदे-पवारांचा करेक्ट कार्यक्रम, जागावाटपात काय ठरलं?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

 mahayuti maharashtra seat sharing amit shah meeting ajit pawar eknath shinde devendra fadnavis loksabha election 2024
एकनाथ शिंदे यांनी अमित शाहांसमोर 13 जागांचा प्रस्ताव ठेवला. तर अजित पवार यांनी 9 जागांची मागणी केली होती.
social share
google news

Mahayuti Lok Sabha Seat Sharing : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात सत्ताधारी महायुतीच्या जागावाटपाला वेग आला आहे. या संदर्भात मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची महायुतीच्या तीनही नेत्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार यांनी 9 जागा तर एकनाथ शिंदे यांनी 13 जागांची मागणी केली होती. मात्र दोघांना मिळून सिंगल डिजिट जागा मिळण्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.पण अद्याप जागावाटप ठरलं नाही आहे. याबाबतचा अंतिम निर्णय दिल्लीतून होणार आहे. ( mahayuti maharashtra seat sharing amit shah meeting ajit pawar eknath shinde devendra fadnavis loksabha election 2024) 

महाराष्ट्रातील जागावाटपावर चर्चा करण्यासाठी अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी रात्री सह्याद्री अतिथिगृहावर बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. या बैठकीपुर्वी 22 जागांची मागणी करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी अमित शाहांसमोर 13 जागांचा प्रस्ताव ठेवला. तर अजित पवार यांनी 9 जागांची मागणी केली होती. या मागणीनंतर अमित शाह यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 10 जागा आणि अजित पवार गटाला फक्त 4 जागा दिल्या होत्या. 

हे ही वाचा : Jayashree Thorat : थोरातांची तिसरी पिढी सक्रिय राजकारणात!

लोकसभेत भाजपच्या विजयाची शक्यता जास्त आहे. त्यामुळे आता आम्हाला अधिक जागा द्या. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत भाजप युतीतील घटक पक्षांसाठी अधिक जागा सोडणार आहे, अशी डिल अमित शाह यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसोबत केली आहे. त्यानुसार लोकसभा निवडणूकीत भाजपला 48 पैकी 32 जागा स्वत: लढवायच्या आहेत. यामध्ये परभणी, औरंगाबाद, उस्मानाबाद आणि रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागांवरही भाजपला फेरबदल हवा आहे. आणि उरलेल्या 16 जागा शिंदे-पवार गटाला द्यायच्या आहेत. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान अजित पवारांनी ठेवलेल्या प्रस्तावात एक जागा बारामतीची आणि दुसरी जागा गडचिरोली आहे.  बारामतीतून अजित पवारांना सुनेत्रा पवार यांना उभे करायचे आहेत. तर त्यांच्या समोर शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या प्रतिस्पर्धी असणार आहेत. तर गडचिरोलीतून अजित पवार यांना मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना उभे करायचे आहे,अशी माहिती आहे. 

एकनाथ शिंदे यांनी मुंबईतून 2 जागांची मागणी केली आहे. मात्र भाजपला फक्त ठाण्याची एक जागा द्यायची आहे. ही जागा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिली असून विशेषत: एकनाथ शिंदे यांचा चांगलाच प्रभाव राहिला आहे.  

ADVERTISEMENT

हे ही वाचा : 48 मतदारसंघामध्ये कोण जिंकू शकतं? बघा संपूर्ण यादी

दरम्यान बैठकीत अमित शहा यांनी तुम्ही लोकांनी आता कमी जागा घ्या, अशी स्पष्ट ऑफर दिली. मग त्या बदल्यात तुम्हाला विधानसभेत जास्त जागा देऊ शकतात,अशी पेचात टाकणारी ऑफर दिली आहे. यानंतर ते दिल्लीला निघून गेले आहेत. आता जागावाटपाचा अंतिम निर्णय दिल्लीत होणार आहे. तत्पुर्वी जागावाटपावर पुन्हा चर्चा करण्यासाठी शिंदे-पवार दिल्लीला जाणार आहे. त्यामुळे जागावाटपावरून त्यांच्यात काय वाटाघाटी होते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT