Shiv Sena : CM शिंदेंच्या 10 आमदारांचा पत्ता होणार कट? कोणत्या आमदारांची नावं?
Maharashtra Assembly Election Survey : विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीही अवेघ काही दिवस शिल्लक असताना आलेल्या या सर्व्हेमुळे एकनाथ शिंदे यांच्या अनेक आमदारांची धाकधूक वाढल्याचं चित्र दिसतंय.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
शिवसेनेच्या अनेक मोठ्या नेत्यांचे तिकीट कापणार?
विधानसभेच्या तोंडावर आलेल्या सर्व्हेमुळे खळबळ
कोणत्या आमदारांचे पत्ते कट होण्याची शक्यता
CM Eknath Shinde MLA मुंबई : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजले असून, सगळेच पक्ष आता तयारीला लागलेत. कुणाची ताकद किती हे आजमावून तिकीट वाटपाची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे. पुढच्या काही दिवसातच उमेदवार याद्याही समोर येतील आणि प्रत्येक मतदारसंघाचं चित्र स्पष्ट होईल. तर दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपासाठी बैठकी घेतल्या जातायत. मात्र आता अशातच आलेल्या एका सर्व्हेमुळे महायुतीतले बडे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताण वाढवणार असल्याचं दिसतंय. (Mahayuti Survey amid maharashtra assembly election 2024 is shocking for cm eknath shinde shiv sena )
लोकसभेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या अनेक मोठ्या चेहऱ्यांचे तिकीट कापण्यात आले होते. यामध्ये हेमंत पाटील, भावना गवळी यांच्यासारख्या नावांचा समावेश होता. त्यावेळीही भाजपनेच शिंदेंना हे उमेदवार बदलायला सांगितले असं म्हटलं जात होतं. मात्र आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आलेल्या एका सर्व्हेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या विद्यमान 25 टक्के आमदारांचा पत्ता कट होण्याची चिन्ह दिसत आहेत.
हे ही वाचा >>Maharashtra Live Updates: मंत्री धनंजय मुडेंनी फोडला प्रचाराचा नारळ! कार्यकर्त्यांना केलं मोठं आवाहन, म्हणाले...
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
विधानसभा निवडणुका तोंडावर असताना या सर्व्हेमुळे एकनाथ शिंदे यांच्या अनेक आमदारांची धाकधूक वाढल्याचं चित्र दिसतंय. एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सध्या 40 आमदार आहेत, त्यापैकी तब्बल 10 आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. या यादीमध्ये मुंबई आणि मराठवाड्यातील काही आमदारांचं नाव असल्याची शक्यता आहे.
हे ही वाचा >>महाराष्ट्र निवडणुकांमध्ये भाजपची रणनीती काय? पाहा VIDEO
दरम्यान, राज्यात नोव्हेंबर महिन्यात पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासूनच राजकीय घडामोडींना वेग आलाय. सध्या अनेक पक्षांसमोर बंडखोरीचं आव्हान आहेच, मात्र त्यातही विद्यमान आमदारांचा पत्ता कट झाल्यास नाराजीची मोठी लाट येऊ शकते. त्यामुळे आता पुढच्या 10 दिवसात नेमक्या काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT