'एक महिन्याचं सामान घेऊन मुंबईत घुसणार', मराठा बांधव धडाधड बोलून गेले..

मुंबई तक

Manoj jarange patil andolan antarwali sarati : मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीत मराठा बांधवांची मोठी गर्दी झाली आहे. मागण्या मान्य न झाल्यास एक महिन्याचे साहित्य घेऊन मुंबईला जाण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

ADVERTISEMENT

Manoj jarange patil andolan antarwali sarati
Manoj jarange patil andolan antarwali sarati
Google CTA

बातम्या हायलाइट

point

'एक महिन्याचं सामान घेऊन मुंबईत घुसणार'

point

मराठा बांधव धडाधड बोलून गेले..

Manoj jarange patil andolan antarwali sarati : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला तीन वर्षे पूर्ण होत असताना मराठा समाजाकडून सरकारने आपल्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास मुंबईला जाण्याचा इशारा मराठा आंदोलकांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर जालन्यातील अंतरवाली सराटीत राज्याच्या विविध भागांतून मराठा बांधव मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण सुरू करणार असून, हे आंदोलन निर्णायक असल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा : आंदोलनासाठी गेले अन् नियतीचा घाला, बीडच्या आंदोलकाचा हृदय विकाराने मृत्यू

मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईला जाण्याची तयारी

अंतरवाली सराटीत दाखल झालेल्या आंदोलकांनी सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. सरकारने आतापर्यंत आश्वासने दिली, मात्र ठोस निर्णय घेतला नाही, असा आरोप आंदोलकांनी केला. घणसावंगीहून आलेल्या एका आंदोलकाने सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण करावीत, अशी मागणी केली. मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईला जाण्याची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले. पंढरपूरहून आलेल्या 50 जणांच्या गटानेही एक महिन्याचे जेवण, खाणे-पिणे आणि आवश्यक साहित्य घेऊन आल्याचे सांगितले.

हेही वाचा : MPSC पेपर लीक : सहा नेते, असंख्य फोटो..सुनील गाढवेचे कोणत्या नेत्यासोबत संबंध?