Manoj Jarange Patil : ‘तो एकटाच वळवळत सुटलाय!’, जरांगेंची भुजबळांवर पुन्हा एकेरी टीका

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

manoj jarange patil criticize chhagan bhujbal on maratha reservation cm eknath shinde maharashtra politics
manoj jarange patil criticize chhagan bhujbal on maratha reservation cm eknath shinde maharashtra politics
social share
google news

Manoj Jarange Patil Criticize Chhagan Bhujbal,Maratha Reservation : मंत्री छगन भुजबळ यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. मराठ्यांना मागच्या दारातून आरक्षण देऊ नये, अशी भूमिका छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) आज देखील माध्यमांसमोर माडंली. छगन भुजबळांच्या या भूमिकेला मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil)  जोरदार विरोध केला आहे. छगन भुजबळांच्या अशा भुमिकेला भाजपची साथ आहे का? असा सवाल माध्यमांनी विचारला होता. यावर नाही तो एकटाच वळवळ सुटलाय अशी टीका जरांगे पाटलांनी भुजबळांवर केली. (manoj jarange patil criticize chhagan bhujbal on maratha reservation cm eknath shinde maharashtra politics)

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)  माध्यमांशी बोलत होते. हा स्वत: ला ओबीसी नेता म्हणवून घेतो, पण त्यांचेचे नेत त्यांना मानायला तयार नाहीत. स्वत:च्या जातीवर अन्याय करतो. ओबीसींच महामंडळ खाल्ल अशा नेत्याला महत्व देण्यात काही अर्थ नाही, अशा शब्दात जरांगे पाटलांनी भुजबळांवर टीका केली. तसेच छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) भाजपची साथ आहे का? असा सवाल एका पत्रकाराने विचारला होता.नाही तो एकटाच वळवळ सुटलाय, अशी जरांगेंनी टीका केली.

हे ही वाचा : Nalasopara Crime : बंद खोली, कुजलेला मृतदेह अन्…, अल्पवयीन मुलीची हत्या कुणी केली?

तुमचा बोलविता धनी कोण? असा सवाल राज ठाकरे यांनी केला होता. यावर जरांगे पाटील म्हणाले, शोधा की, तुम्हीच शोधा, आम्हाला दाखवा, आम्हीच त्याच्याकडे बघतो. पैसै बिसै घ्यायला आणि रसद पुरवायला हे आंदोलन नाही हे शेतकऱ्यांच्या घामाचे पैसै आहेत. म्हणून तर आंदोलन टीकले आहे आणि यांना काही करता येत नाही आहे,असे जरांगे म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

तसेच मराठ्यांचा आजचा लढा पुर्वीसारखा लढा राहिला नाही. तसेच जर मराठ्यांच्या सरसकट आरक्षणाला विरोध केला तर फडणवीस अडचणीत येणार आहेत आणि जे नेते बरळले आहेत यांना चप्पल काढल्याशिवाय मराठे सोडणार नाही, असा इशाराचा जरांगे पाटलांनी नेत्यांना दिला आहे.

हे ही वाचा : Chandrayaan 3 Returns Home : ‘चांद्रयान 3’ ची घरवापसी! ‘इस्त्रो’चा ‘हा’ मोठा प्रयोग यशस्वी

    follow whatsapp

    ADVERTISEMENT