Maratha Reservation: Manoj Jarange यांनी टाकला नवा डाव, केली प्रचंड मोठी घोषणा
Manoj Jarange Maratha Reservation Mumbai: मनोज जरांगे यांनी 20 जानेवरी 2023 रोजी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा बीडमधील इशारा सभेत केली आहे.
ADVERTISEMENT
Manoj Jarange Beed Sabha Live: बीड: मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेली दोन महिन्यांची मुदत ही उद्या (24 डिसेंबर) संपणार आहे. त्यामुळे आज (23 डिसेंबर) बीडमध्ये इशारा सभा घेत मनोज जरांगे यांनी आरक्षणासाठी नवा डाव टाकला आहे. अतंरवाली सराटीतून आरक्षण सुरू करून ग्रामीण भागातील मराठा समाजाला एकवटणाऱ्या मनोज जरांगेंनी आता थेट मुंबईला धडक देण्याचं जाहीर केलं आहे. जरांगेंनी आता मुंबईत येऊन आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा यावेळी केली आहे. यासाठी त्यांनी सभेतील सर्वांना विचारून 20 जानेवारी ही उपोषणाची तारीख निश्चित केली आहे. (maratha reservation manoj jarange has announced in a public meeting in beed he will go on fasting from 20 january 2023 at azad maidan in mumbai)
ADVERTISEMENT
मनोज जरांगेंनी असा टाकला नवा डाव, सरकारला टाकलं पेचात…
‘शब्द पाळायचा, मोडायचा नाही.. किती तारीख ठरायची तुमच्या अंदाजाने.. मुंबई-मुंबईच म्हणताय.. आम्ही सहन तरी किती दिवस करायचं.. तुम्ही माझ्याकडून 30 दिवस, नंतर 40 दिवसांचा वेळ घेतला.. पुन्हा दोन महिन्यांचा वेळ घेतला होता. 24 डिसेंबरपर्यंत.. तुम्ही किती दिवस आम्हाला मूर्ख समजणार आहात.’
‘आम्हाला काय तरी मर्यादा आहे.. मला असं वाटतं.. पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवायची का? तारीख पण ठरवायची का? तयारीला लागा.. तुम्ही पंधरा म्हणाले पण पंधरा नाही.. त्यांनी काय डाव टाकला ते माहितेय का तुम्हाला?’
‘त्यांनी आपल्याला नोटीसा दिला.. आणि मुंबईला 144 लागू केला कितीपर्यंत तर 18 तारखेपर्यंत.. चलो 20 जानेवारी मुंबईला.. आमरण उपोषणाला.. आमरण उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात बसणार..’ अशी घोषणाच मनोज जरांगे यांनी केली आहे.
हे ही वाचा>> Manoj Jarange: ‘तुझ्या डोक्यात गटार भरल्यासारखे किडे आहेत..’, जरांगेची भुजबळांवर जहरी टीका
‘मराठा समाजाला डिवचू नका..’
‘माझी सरकारला पुन्हा विनंती आहे.. मराठा समाजाला डिवचू नका.. यांना काय वाटलं होतं की, त्या मागे केसेस झालेल्या.. त्यांना वाटलेलं आपण भितो..’
‘त्यांनी पूर्वी आपल्याला गुंतवायचा प्रयत्न केला. त्यांनी पुन्हा एक डाव रचला.. म्हणे आपल्याला नोटीसा देऊ.. किती बधीरसारखे वागू लागले हे मंत्री लोकं.. आरक्षण आम्ही हिसकावून आणणारच..’
हे वाचलं का?
हे ही वाचा>> Manoj Jarange : ‘तुम्ही विचार करायचा होता ना?’, जरांगे पाटलांनी पकडलं कात्रीत
‘मराठा बांधवांना विनंती आहे.. की, तुम्ही मला 17 तारखेला शब्द दिलाय. महाराष्ट्राच्या मराठ्यांनी आंदोलन करायचं.. पण शांततेत.. शांततेच्या आंदोलनात प्रचंड ताकद आहे. म्हणून आरक्षण निर्णय प्रक्रियेत आलं आहे.’ असं म्हणत जरांगे-पाटील यांनी सरकारला देखील पेचात पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT