Manoj Jarange : “आम्हाला खिंडीत…”, ठाण्यात येऊन जरांगेंनी शिंदे सरकारला ललकारले
मराठा समाजाच्या रात्री उशिराने होणाऱ्या सभांच्या आयोजकांवर गुन्हे दाखल व्हायला सुरूवात झाली आहे. यावर जरांगे पाटील म्हणाले, सरकारने गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू करून चांगलं काम केलंय अशी उपहासात्मक टीका केली.
ADVERTISEMENT
Manoj Jarange Patil Reaction on case register Meeting : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी ओबीसीतून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या मागणीसाठी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढायला सुरूवात केली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी त्यांच्या सभा पार पडल्या आहेत. या सभांमधून नियमांचे उल्लघन झाल्याचा वाद सुरु झाला होता. या वादानंतर आता जरांगे पाटलांच्या (Manoj Jarange Patil) सभा आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. या गुन्ह्यांवर आता मनोज जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. (maratha reservation manoj jarange patil reaction on case register against organizer meeting cm eknath shinde thane rally)
ADVERTISEMENT
मराठा समाजाच्या रात्री उशिराने होणाऱ्या सभांच्या आयोजकांवर गुन्हे दाखल व्हायला सुरूवात झाली आहे. यावर जरांगे पाटील म्हणाले, सरकारने गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू करून चांगलं काम केलंय अशी उपहासात्मक टीका केली. तसेच जनता महत्त्वाची नाही, क्रिकेट रात्रभर चालले तरी चालतं. तिथे काय तोंडाला बांधलेले नसतं तोंडाला टाके टाकलेले नसतात ते चालतं अशी टीका जरांगे पाटलांनी यावेळी केली.
हे ही वाचा : Ind vs Aus World Cup Final: टीम इंडिया फायनलमध्येच का हरली? 6 गोष्टी पडल्या महागात
मराठा समाजात रोष होता, पण सभांमुळे काही अंशी रोष कमी झाल्याचे जरागे म्हणाले आहेत. तसेच आम्ही सरकारचं काम करतोय. उलट सरकारने सभा घेऊन द्यायला पाहिजे होत्या मात्र आम्हाला खिंडीत पकडायचं म्हटलं तर पुढे बघू असा इशारा जरांगेनी दिला. तसेच आमचा एकही माणूस त्या कारवाईला घाबरणार नाही आम्ही समाजासाठी काम करतोय, पोलीस बांधवांवर दबाव असू शकतो असे देखील जरांगे म्हणाले आहेत.
हे वाचलं का?
मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात सभेवर काय म्हणाले?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात मनोज जरांगे पाटलांची सभा होते आहे. या सभेच्या बॅनरवर मुख्यमत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदेंचाही फोटो झळकला आहे. या जरांगे पाटील म्हणाले.कोणाचा बालेकिल्ला आहे म्हणून जायचं असं काही संबंध नाही. समाजाशी संवाद साधला पाहिजे यासाठी मी आलोय. तसेच मी शक्तीप्रदर्शन केले नाही. राज्यातल्या मराठा समाजाचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात गावोगावी जातो आहे. हे शक्तिप्रदर्शन नाही तर जनजागृती केली पाहिजे, बाकी काही उद्देश नसल्याचे जरांगे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
हे ही वाचा : टक्कल केलं, सिगारेटने जाळलं अन् निर्वस्त्र… अकोल्यात वासनांध तरूणाचे 14 वर्षीय मुलीसोबत क्रूर कृत्य!
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT