Maratha Reservation : ‘ही माणसं फार निष्ठुर आहेत..’ राज ठाकरेंनी मनोज जरांगेंना पाठवलेलं पत्र जसंच्या तसं

प्रशांत गोमाणे

या पत्रातून राज ठाकरे यांनी बेफिकीर लोकांसाठी तुम्ही तुमचा जीव पणाला लावणं योग्य वाटत नाही, म्हणून तुमचं उपोषण तुम्ही तात्काळ थांबवावं अशी विनंती जरांगे पाटलांना केली आहे.

ADVERTISEMENT

maratha reservation mns raj thackeray letter to manoj jarange patil agitation antarawali sarati
maratha reservation mns raj thackeray letter to manoj jarange patil agitation antarawali sarati
social share
google news

Maratha Reservation MNS Raj Thackeray letter to manoj jarange patil : मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच पेटला आहेत. या मुद्द्यावर विविध राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत. असे असतानाच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांना (Manoj Jarange Patil) खुलं पत्र लिहलं आहे. या पत्रातून राज ठाकरे यांनी बेफिकीर लोकांसाठी तुम्ही तुमचा जीव पणाला लावणं योग्य वाटत नाही, म्हणून तुमचं उपोषण तुम्ही तात्काळ थांबवावं अशी विनंती जरांगे पाटलांना केली आहे. (maratha reservation mns raj thackeray letter to manoj jarange patil agitation antarawali sarati)

राज ठाकरेंचे मनोज जरांगेना पाठवलेले पत्र

प्रिय बंधू मनोज जरांगे पाटील,
सस्नेह जय महाराष्ट्र !

‘इथली राजकीय व्यवस्था भंपक आहे. त्यांना तुमच्याकडून निवडणुकीत फक्त मतदान हवं आहे. ते एकदा मिळालं की हे आपली सगळी आश्वासनं विसरणार अशी ह्यांची वृत्ती आहे. त्यांना तुम्ही ज्या मागणीसाठी उपोषण करत आहात त्याच्याशी काहीही देणं-घेणं नाही. अशा खोटारड्या, बेफिकीर लोकांसाठी तुम्ही तुमचा जीव पणाला लावणं योग्य वाटत नाही म्हणून तुमचं उपोषण तुम्ही तात्काळ थांबवावं अशी विनंती करायला हे पत्र लिहित आहे’.

हे ही वाचा : Mumbai Crime : पतीसोबत भांडण झालं अन् पडली घराबाहेर, नंतर गार्डनमधील शौचालयात…

”तुमच्या मागच्या उपोषणाच्यावेळी हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे असं मी तुम्हाला म्हणालो होतो. अशा प्रश्नांना हात घालण्याची ह्या राज्यकर्त्या मंडळींची इच्छा नाही”, असंही म्हणालो होतो. ”नुसतं जातीच्या नावानं मतं मागायची, खोटी आश्वासनं द्यायची असे ह्यांचे उद्योग”. ”आपणही मग भाबडेपणानी ह्यांना मतदान करतो. आपल्या जातीचा म्हणून आपला वाटला, आपल्यासाठी काही करेल असं वाटलं म्हणून ह्यांना मतदान केलंत. एकदा नाही अनेकदा केलंत. त्याचा ह्यांनी गैरफायदा घेतला. ही माणसं फार निष्ठुर आहेत. कोण गेलं, कुणाला इजा झाली ह्या गोष्टींनी ह्यांना काहीही फरक पडत नाही. त्यांच्यासाठी तुम्ही नका जीव पणाला लावू”.

हे वाचलं का?

    follow whatsapp