MLA Disqualification : “ठाकरे गटाचे 16 आमदार अपात्र होतील”, निकालाआधी शिंदेंच्या आमदाराचा दावा

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

mla disqualification 16 mlas of thackeray faction will be disqualified says yogesh kadam
mla disqualification 16 mlas of thackeray faction will be disqualified says yogesh kadam
social share
google news

Yogesh Kadam on Shiv Sena Mla Disqualification Case verdict : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरील सुनावणी पूर्ण झाली. या प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर 10 जानेवारीपर्यंत देणार आहेत. कारण ही वेळ मर्यादा सुप्रीम कोर्टाने त्यांना घालून दिली आहे. दरम्यान, या निकाला आधी राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. या भेटीचं कारण समोर आलं नाही, मात्र वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहे. दरम्यान, आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाआधी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी एक मोठं विधान केलं आहे.

ADVERTISEMENT

राहुल नार्वेकरांनी रविवारी (7 जानेवारी ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. या भेटीबद्दल बोलताना आमदार योगेश कदम म्हणाले,”त्यांनी कुठल्या विषयावर भेट घेतली याची मला काही कल्पना नाही. ही भेट झाली हे मला माध्यमातून कळलं. त्या भेटीत मी उपस्थित नव्हतो, त्याबद्दल मी बोलू इच्छित नाही. परंतु, एक मी सांगेन की, सुनावणी दरम्यान ज्या गोष्टी घडल्या किंवा काही गोष्टी समोर आल्या. मी स्वतः साक्षीदार होतो आणि माझी साक्ष देत असताना मी ज्या गोष्टी तिथे उघड केल्या आहेत. आम्ही ज्या गोष्टी तिथे मांडल्या आहेत. किंवा युक्तिवाद झाला, तेव्हा कुणाची बाजू वजनदार आहे, हे तिथेच स्पष्ट झाले होते.”

आम्हाला शॉक लागणार नाही – योगेश कदम

कदम यांनी पुढे सांगितलं की, “मला वाटतं की आम्हाला अनपेक्षित असा निकाल लागेल, आम्हाला कुठला शॉक बसेल, असं काही होणार नाही. किंबहुना या निकालाच्या अखेरीस ठाकरे गटाचे सगळे आमदार अपात्र होऊ शकतात, असा माझा अंदाज आहे. शेवटी व्हीप कुणाचा लागू होतो आणि व्हीप कशापद्धतीने दिलेला आहे, या सगळ्या गोष्टी तिथे बघितल्या जातील. मला विश्वास आहे की, हा निकाल आमच्या बाजूने लागेल किंबहुना ठाकरे गटाचे सगळे 16 आमदार अपात्र होतील.”

हे वाचलं का?

हेही वाचा >> घरातून बाहेर पडला पण, मोहोळला दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेताच आलं नाही

नार्वेकर-शिंदे भेटीने चर्चांना उधाण

आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देण्यापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीचे नेमके कारण समोर आले नसले, तरी शिंदे आणि नार्वेकर यांच्यात अपात्रता प्रकरणाबद्दल चर्चा झाल्याचे काही वृत्तपत्रांनी दिले आहेत.

हेही वाचा >> 2019 ला ‘कट्यार पाठीत घुसली’, मग आम्ही 2022 मध्ये…”, फडणवीसांनी ठाकरेंना केलं लक्ष्य

प्रकरण पुन्हा सुप्रीम कोर्टात जाणार?

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे काय निकाल देतात, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. दरम्यान, नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला, तर हे प्रकरण पुन्हा सुप्रीम कोर्टात जाऊ शकतं. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाचं पुनर्विलोकन करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून नार्वेकरांकडून दिलेल्या निर्णयाला आव्हान दिलं जाऊ शकतं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT