Mla Disqualification : आमदार अपात्रता प्रकरणात नार्वेकरांनीच ठोठावले सुप्रीम कोर्टाचे दार
mla disqualification latest news : राहुल नार्वेकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट काय घेणार निर्णय? कोर्टाने मागणी मान्य केल्यास निकालासाठी उजाडणार पुढचं वर्ष.
ADVERTISEMENT

Mla disqualification case maharashtra : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरील निकाल 31 डिसेंबरपूर्वी देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले असतानाच एक मोठी अपडेट घडली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले असून, कोर्टाने मागणी मान्य केल्यास लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निकाल लागू शकतो.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरील सुनावणी सुरू आहे. दोन्ही गटाच्या नेत्यांची उलटतपासणी झाली असून, आता 18 डिसेंबरपासून या प्रकरणावरील युक्तिवाद सुरू होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हिवाळी अधिवेशनातही सुनावणी घेत आहे. निकालाची प्रतिक्षा असतानाच नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टात विनंती याचिका दाखल केली आहे. दोन्ही गटांनी दोन लाख 71 हजार पाने कागदपत्रे सादर केली आहेत. त्यात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे प्रकरणावरील निकाल देण्यासाठी वेळ वाढवून द्यावा, अशी विनंती नार्वेकरांनी केली आहे.
हेही वाचा >> “कटोरा हात मैं लेकर, बाबा के नाम दे”, वडेट्टीवार भुजबळांवर कडाडले
…तर पुढच्या वर्षी येणार निकाल?
राहुल नार्वेकर यांनी तीन आठवड्यांचा अवधी वाढवून मागितला आहे. नार्वेकरांनी याचिकेत तारखेचाही उल्लेख केलेला आहे. 21 जानेवारीपर्यंत वेळ वाढवून देण्याची मागणी केलेली आहे. या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. कोर्टाने नार्वेकरांची मागणी मान्य केल्यास आमदार अपात्रता याचिकेवरील निकाल पुढच्या वर्षीच येऊ शकतो.