Mla Disqualification : “शिंदेंनी तसं केलंच नाही”, ठाकरेंनी नार्वेकरांना काय सांगितलं?

योगेश पांडे

mla disqualification case maharashtra : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरील सुनावणीवेळी ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी एकनाथ शिंदेंकडून घेण्यात आलेल्या निर्णयावरच बोट ठेवण्यात आले.

ADVERTISEMENT

uddhav Thackeray vs Eknaths shinde : mla disqualification case hearing latest news
uddhav Thackeray vs Eknaths shinde : mla disqualification case hearing latest news
social share
google news

Mla Disqualification latest News : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी युक्तिवादाला सोमवारपासून (18 डिसेंबर) सुरुवात झाली. सुरुवातीला ठाकरे गटाकडून युक्तिवाद करण्यात आला. उद्धव ठाकरे यांच्याकडून युक्तिवाद करताना वकील देवदत्त कामत यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या गटाने केलेल्या राजकीय कृतींचा मुद्दा अधोरेखित केला. बंडखोरीनंतर शिंदे गटाने घेतलेल्या निर्णयावर बोट ठेवत कामतांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर काही महत्त्वाच्या बाबी मांडल्या. (Mla Disqualification Hearing)

शिंदे गटाला दुसऱ्या पक्षात विलीन होण्याशिवाय पर्याय नाही -कामत

युक्तिवाद करताना देवदत्त कामत सुरुवातीला म्हणाले, “1984,1985 मध्ये जेव्हा 10 शेड्युल अस्तित्वात आलं. त्यावेळी आपल्याला माहिती आहे की, कसं आयराम-गयारामचं राजकारण होतं. विधिमंडळ पक्षाकडून पार्टी हायजॅक करण्याची प्रथा पूर्वी कधी नव्हती. तुमच्याकडे (शिंदे गट) एकच शेवटचा डिफेन्स आहे, तो म्हणजे की तुम्ही (शिंदे गट) दुसऱ्या राजकीय पक्षात विलीन होणे.

नियमानुसार काहीच झालेलं नाही -ठाकरेंचे वकील

कामत पुढे म्हणाले की, “तुम्हाला (शिंदे) जर नेतृत्व मान्य नव्हतं, तर तुम्ही प्रतिनिधी सभा, राष्ट्रीय कार्यकारिणी घेऊन नेतृत्व बदल करायला हवा होता. पक्षाचे कार्यकर्ते खुश नव्हते, तर नेतृत्व बदलासाठी नियमानुसार काही केलेले नाही. विधिमंडळ, पक्ष, न्यायपालिका ही एक प्रोसेस आहे. 2018 मध्ये कुठलीही घटना दुरुस्ती झालेली नव्हती. 1999 च्या घटनेनुसार 2018 ची घटना सेम होती. त्यात बदल करण्यात आलेला नव्हता.”

“शिंदेंनी स्वतः नेता म्हणून घोषित केलं” -कामत

कामत युक्तिवादावेळी म्हणाले, “पक्ष म्हणजे काय तर पदाधिकारी. पक्षाचे प्रतिनिधी हे केवळ नोंदणीकृत पदाधिकारी आहेत. तुम्हाला आवडत नाही, तर त्याविरुद्ध मतदान करा नाही, तर सोडा. तुम्हाला पटत नसेल तर व्यक्त व्हा. राष्ट्रीय किंवा प्रतिनिधी सभा घ्या, तसे झालेच नाही. यांनी तसे केलेच नाही, पक्षातील स्थिती बदलण्यापूर्वीच स्वतःला नेता म्हणून घोषित केले. तोपर्यंत उद्धव ठाकरे हे प्रमुख नेते होते. उद्धव ठाकरेंनी स्वतःहून पद सोडलेले नाही. प्रथमदर्शनी सूरत, गुवाहाटीला जाणे, तिथे बसून व्हीप बदल करणे, क्रॉस व्होटिंग केले तर तर कारवाई केली जाऊ शकते, याबद्दल पुरेसे पुरावे आहेत.”

हे वाचलं का?

    follow whatsapp