शिवसेना आमदारांना नोटिसा, ठाकरे म्हणाले, ‘…तर आम्ही कोर्टात जाऊ’

मुंबई तक

ADVERTISEMENT

mla disqualification process udhhav thackeray warn rahul narwekar before decision maharashtra politics
mla disqualification process udhhav thackeray warn rahul narwekar before decision maharashtra politics
social share
google news

Maharashtra Political Latest News : बंडखोर आमदारांवरील कारवाईसाठी ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar)  यांनी ठाकरे आणि शिंदे गटाच्या सर्व आमदारांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे यावर आता लवकरच निर्णय़ अपेक्षित आहे. या सर्व घडामोडींवर आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांनी प्रतिक्रिया देऊन विधानसभा अध्यक्षांनाच इशारा दिला आहे.(mla disqualification process udhhav thackeray warn rahul narwekar before decision maharashtra politics)

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे यवतमाळमध्ये पत्रकारांशी बोलत होते. एका पवित्र स्थळापासून सुरूवात करायची होती आणि पोहरा देवीचे दर्शन घ्यायचे देखील मनात होते, त्यामुळे येथून दौऱ्याला सुरूवात केल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच आधी पक्ष फोडला जायचा, आता पक्ष पळवला जातो, असा टोला ठाकरेंनी भाजपला लगावला. पण पक्ष फोडून सुद्धा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे.पण काळजी करू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा आत्मविश्वास देखील ठाकरेंनी कार्यकर्त्यांमध्ये भरला.

हे ही वाचा : ‘अजित पवारांना आरएसएस, नितीन गडकरी गटाचा विरोध’, पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितली सगळी स्टोरी

आमदारांच्या अपात्रतेवर काय म्हणाले?

सर्वोच्च न्यायालयाने जो अर्थ काढून दिला आहे. त्याच्यापलिकडे कोणालाही पाहता येणार नाही. पाहायचं म्हटलं तरी. सर्वोच्च न्यायालयाने स्वच्छ आणि स्पष्ट शब्दामध्ये निकाल दिला आहे. त्या निकालाच्या चौकटीमध्येच अध्यक्षांना निर्णय़ घ्यावा लागेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. जर चौकटीबाहेर निर्णय घेतला, मला वाटतं ते लोहशाहीला धरून होणार नाही. तसे अध्यक्ष वागतील असे मला वाटत नाही, पण तसे जर केले तर सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे आम्हाला खुले असतील. आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतो,असा थेट इशाराच त्यांनी विधानसभा अध्यक्षांना दिला.

हे वाचलं का?

राजकारणात आता फोडाफोडीचे धंदे सुरु आहेत. त्यावेळी माझ्या आणि अमित शहा यांच्यात जे ठरलं होते, मी आई-वडिलांची शपथ घेऊन शिवाजी पार्कवर बोललो होतो, आज पोहरादेवीची शपथ घेऊन बोलतो, ”अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री तर अडीच वर्ष भाजपचा मुख्यमंत्री हे ठरलं होतं, त्याप्रमाणे जर केले असते, तर कदाचित भाजप-शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता आणि जुन्या भाजपच्या कार्यकर्त्यांना सतरंज्या उचलाव्या लागल्या नसत्या,असे उद्धव ठाकरे म्हणाले आहे. तसेच आज आयुष्यभर भाजपसाठी ज्या नेत्यांनी खस्ता खाल्ला, ते नेते आता बाहेरून येणाऱ्यांच्या सरबढाईत लागले आहेत, असे म्हणत त्यांनी भाजप नेत्यांना डिवचलं आहे.

हे ही वाचा : ‘तुम्ही 50 ठिकाणी माफी मागणार आहात का?’, छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल

सगळ्यांनाच मुख्यमंत्री व्हायचंय ही सगळी आपआपली हौस झाली. पण कोणीही मुख्यमंत्री झाल्यानंतर शेतकऱ्यांना काय मिळतं, हा मोठा प्रश्न आहे. तसेच तुम्ही पिक कापले असतील. पण शेती आमची आहे ना, त्यामुळे पीक नवीन येणार.आता त्यांनी जी कापणी केली आहे त्यांना हमीभाव मिळतो का बघा, असा टोला देखील ठाकरेंनी भाजपला लगावला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT