Maratha Reservation: शहाजी बापूंची गाडी अडवली, आमदार साहेब खाली उतरले, कानात कुजबुजले अन्…
‘काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल, सगळं ओकेमध्ये’ असा मोबाईलवरचा ज्यांचा संवाद प्रचंड व्हायरल झाला होता. त्या शिंदे गटाच्या आमदार शहाजी बापू पाटील यांची कार आज पंढरपूरमध्ये अडविण्यात आली.
ADVERTISEMENT
Maratha Reservation : मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी बेमुदत उपोषण पुकारले आहे. त्यानंतर राज्यभरातील मराठा समाज रस्त्यावर उतरला. त्यातच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी घालण्यात आली. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या गाड्या अडवणे, त्यांना गाव बंदी करण्याचे प्रकार घडले आहेत. ‘काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल, सगळं ओकेमध्ये’ असा मोबाईलवरचा ज्यांचा संवाद प्रचंड व्हायरल (Viral Audio Clip) झाला होता. त्या शिंदे गटाच्या आमदार शहाजी बापू पाटील (MLA Shahji Bapu Patil) यांची कार आज पंढरपूरमध्ये अडविण्यात आली. त्यामुळे काही काळ रस्त्यावर तणाव निर्माण झाला होता.
ADVERTISEMENT
आंदोलनस्थळी बंदी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर आंदोलन सुरु आहे. या आंदोलनावेळी राजकीय नेत्यांना आंदोलनस्थळी बंदी घालण्यात आली. त्यामुळे अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांची मराठा आंदोलनकर्त्यांनी अडवणूक केली आहे. त्यातच आज शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांची पंढरपूरमध्ये गाडी अडवून सरकारविरोधात आणि लोकप्रतिनिधींविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
हे ही वाचा >> Bhupinder Jogi : 5 वर्ष जुन्या VIDEO ची एवढी का चर्चा? ‘ही’ आहे रिअल स्टोरी
ड्रायव्हरवर आरोप
मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात प्रत्येक गावामध्ये राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. आज सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील हे पंढरपूरमध्ये आले होते. त्यावेळी आंदोलनकर्त्यांनी शहाजी बापूंची गाडी अडवली होती. त्यावेळी शहाजी बापूंच्या ड्रायव्हरने गाडी अंगावर घातल्याचा आरोप आंदोलन करते संदीप मांडवे यांनी केला आहे.
हे वाचलं का?
आंदोलनकर्त्यांची मागितली माफी
आंदोलनकर्त्यांनी गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला. त्यानंतर आमदार शहाजी बापू पाटील यांनी गाडीतून उतरत आंदोलनकर्त्यांची माफी मागितली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शहाजी बापू पाटील यांच्या ड्रायव्हरवर राग काढत. तुम्ही आज पंढरपूरमध्ये का आलात असा सवालही आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
हे ही वाचा >> आधी पतीसोबत शॉपिंग, नंतर मेव्हण्याला घेऊन मॉलमधूनच पळाली पत्नी..
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT