मनसे कोणाला टाळी देणार? अमृता फडणवीसांच्या प्रश्नावर राज ठाकरेंचा बाऊन्सर
मागील अनेक दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या भेटी-गाठी वाढल्या आहेत.
ADVERTISEMENT
मुंबई : मागील अनेक दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबतच्या भेटी-गाठी वाढल्या आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात काही नवीन राजकीय समीकरण तयार होणार का असा सवाल विचारला सातत्याने जात असतो. यावरुनच राज ठाकरे यांना जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीच प्रश्न विचारला तेव्हा मात्र त्यांनी दिलेल्या उत्तराने सभागृहात एकच हशा पिकला. (MNS Chief Raj Thackeray Answered to Amruta Fadnavis on alliance with bjp and shivsena)
ADVERTISEMENT
त्याचं झालं असं की, आज लोकमत माध्यम समुहाच्या एका कार्यक्रमात राज ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली. मुलाखतकारांच्या भुमिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीस होते. यावेळी अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांना टाळी आणि डोळे मारण्यावरून प्रश्न विचारला. प्रश्न विचारताना त्या म्हणाल्या, आजकाल राजकारणात टाळी देणे, डोळे मारणे चालू आहे. मध्यंतरी राहुल गांधींनी नरेंद्र मोदी यांना मिठी मारली आणि नंतर डोळा मारला, अजित पवारांनी उद्धव ठाकरेंकडे माईक दिला आणि डोळा मारला. आता तुमचा काय विचार आहे, असा प्रश्न अमृता यांनी विचारला.
हे ही वाचा : भावी मुख्यमंत्री ‘अजित पवार’ : महाराष्ट्रात लागलेल्या होर्डिंग्जचा अर्थ काय?
यावर राज ठाकरेंनी कसला विचार”डोळे मारायचा?” असा सवाल करताच एकच हशा पिकला. यावर अमृता फडणवीस यांनी, “हो डोळे मारायचा आणि टाळी द्यायचाही”, असं म्हणतं प्रतिप्रश्न केला. यावर पुन्हा राज ठाकरे यांनी काही सेकंद विचार करून अत्यंत हजरजबाबी उत्तर दिले. ते म्हणाले, त्याचं काय आहे, ज्या वयातल्या गोष्टी त्या वयात करायच्या असतात, त्यांच्या राहुन गेल्या असतील कदाचित, त्यामुळे त्या आता सुरु आहेत.
हे वाचलं का?
राज ठाकरेंच्या या उत्तरावर पुन्हा अमृता फडणवीस म्हणाल्या, मी राजकारणात सक्रिय नाही पण न्यूज चॅनलवरून कळते की तुम्ही कधी राष्ट्रवादीच्या जवळ दिसता, कधी बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत दिसता तर कधी भाजपाला टाळी देता. हे ‘कभी हा, कभी ना’ आता खूप पाहिले. आता हे ‘हम साथ-साथ है’ हे केव्हा आणि कोणाबरोबर करणार, असा सवाल विचारला.
हे ही वाचा : उद्धव ठाकरेंनी शरद पवारांसमोर खरोखरच पत्करली राजकीय शरणागती?
यावर राज ठाकरे यांनी अमृता फडणवीस यांचा मुलाखतीच्या आधीचा ‘मी भाजपची प्रतिनिधी म्हणून किंवा देवेंद्र फडणवीसांची पत्नी म्हणून बोलणार नाही’ असं सांगितल्याची आठवण करुन दिली. ते म्हणाले, तुम्ही देवेंद्रजींच्या पत्नी म्हणून बोलत नाही आहातच, त्यामुळे सांगूनच टाकतो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीच सध्या कोणाबरोबर आहेत ते कळत नाही. ते पहाटे कुठेतरी गाडी घेऊन जातात, तुम्हाला कित्येकदा पत्ताच नसतो. कधीतरी ते शिंदेंसोबत दिसतात, कधीतरी अजित पवारांचा पहाटे चेहरा उतरलेला दिसतो, असं म्हटलं. त्यावरुन पुन्हा सभागृहात जोरदार हशा पिकला.
ADVERTISEMENT
या बाऊन्सरनंतर राज ठाकरे म्हणाले, काय झालं आहे सध्या, कोणाला भेटणं किंवा बोलणं या गोष्टी पत्रकारांना बातम्या झाल्या आहेत. त्यामुळे राजकारणातला मोकळेपणा मीडियाने घालवला आहे. कोणी कोणाला भेटले, बोलले यामुळे युत्या आणि आघाड्या होत नसतात. जोवर मूर्त स्वरुप येत नाही तोवर त्याला अर्थ नाही, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT