MNS: राज ठाकरेचं भाजपसोबतचं लव्ह-हेट रिलेशन, आतापर्यंत किती वेळा बदलली भूमिका?

राहुल गायकवाड

ADVERTISEMENT

Maharashtra Political updates : mns president raj thackeray love hate politics with bjp, how many times has the role changed so far
Maharashtra Political updates : mns president raj thackeray love hate politics with bjp, how many times has the role changed so far
social share
google news

Raj Thackeray vs BJP: मुंबई: मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि भाजपच्या (BJP) नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाकयुद्ध रंगल्याचं चित्र आहे. कर्नाटकातील भाजपचा पराभव त्याचबरोबर 2 हजाराच्या नोटबंदीवर राज ठाकरेंनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर राज ठाकरेंवर भाजपचे नेते जोरदार टीका करता आहेत. कर्नाटकचा निकाल लागल्यानंतर राज ठाकरेंनी भाजपवर टीका केली होती. ‘आपलं कोण वाकडं करु शकत नाही अशा विचाराचा जो असतो त्याचा हा पराभव आहे. जनतेला, लोकांना कधीही गृहीत धरु नये, हा बोध या निकालातून सर्वांनी घ्यावा’ असं राज ठाकरे म्हणाले होते. त्याचबरोबर ‘भारत जोडो’ यात्रेचा परिणाम या निकालावर दिसत असल्याचे देखील राज ठाकरेंनी स्पष्ट केलं होतं. (mns chief raj thackerays love hate relationship with bjp how many times has the role changed so far)

ADVERTISEMENT

आता 2 हजाराची नोट चलनातून बाद करण्याच्या निर्णयावर देखील राज ठाकरेंनी वक्तव्य केलं होतं. ‘नोटबंदीसारखे निर्णय देशाला परवडणारे नसतात’ असं राज ठाकरे म्हणाले होते, त्याचबरोबर हा धरसोडपणा असून सरकार असं चालतं का? असा सवाल देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता.

आता यावर आमच्या बड्या नेत्यांवर बोलाल, तर मुलाहिजा ठेवणार नाही असं वक्तव्य आशिष शेलारांनी भर सभेत केलं. त्यामुळे राज ठाकरे आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं चित्र आहे. गेल्या काही काळामध्ये भाजप नेत्यांच्या राज ठाकरेंसोबतच्या वाढलेल्या भेटीगाठीवरुन येत्या निवडणुकांमध्ये हे दोन पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा असताना आता एकमेकांवर विखारी टीका सुरु झाल्याचे चित्र आहे.

हे वाचलं का?

2014 पासून राज ठाकरेंच्या भाजपबाबत भूमिका कशा बदलत गेल्या हे आपण पाच मुद्यांमध्ये समजून घेऊया

1. तुम्हाला आठवत असेल तर 2014 च्या आधी राज ठाकरेंनी गुजरातचा दौरा केला होता. त्यावेळी गुजरातच्या विकासावर राज ठाकरेंनी भरभरुन कौतुक केलं होतं. मोदींच्या गुजरात मॉडेलचं देखील राज ठाकरेंनी कौतुक केलं. होतं. मनसेच्या 8व्या वर्धापनदिनी राज ठाकरेंनी मोदींना पंतप्रधान करण्यासाठीचा आपला पाठिंबा जाहीर केला होता. मोदी हेच पंतप्रधान कसे योग्य आहेत, हे सांगण्याचा राज ठाकरे प्रयत्न करत होते.

2. 2014 साली मोदी सत्तेत आले. पुढच्या पाच वर्षांमध्ये अनेक घटना घडल्या. या घटनांनंतर राज ठाकरेंनी मोदींवर सडकून टीका करण्यास सुरुवात केली. 2019 च्या मनसेच्या गुढी पाडव्याच्या सभेत राज ठाकरेंनी मोदी मुक्त भारताचा नारा दिला होता. त्याचबरोबर याच भाषणामध्ये राज ठाकरेंनी मोदींची तुलना थेट हिटलरशी केली होती. मोदींना जशी पंतप्रधान होण्याची संधी दिली तशी संधी राहुल गांधींना द्यायला हवी. असं देखील राज ठाकरे त्यावेळी म्हणाले होते. पुलवामा हल्ल्यावरही राज ठाकरेंनी त्यावेळी प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> UPSC चा निकाल जाहीर, महाराष्ट्रातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संपूर्ण यादी एका क्लिकवर

3. 2019 मध्ये मोदी सरकारला पाच वर्ष देखील पूर्ण झाली होती. 2019 च्या निवडणुकींच्या काळात महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये सभा घेऊन भाजपच्या विरोधात वातावरण निर्माण करण्यास राज ठाकरेंनी सुरुवात केली. राज ठाकरेंनी अनेक ठिकाणी सभा घेऊन मोदींचे जुने व्हिडीओ दाखवून त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. राज ठाकरेंच्या ‘लाव रे तो’ व्हिडीओच्या सभा चांगल्याच गाजल्या होत्या. याच काळात राज ठाकरे राष्ट्रवादीच्या जवळ जात आहेत का? असे प्रश्न देखील उपस्थित करण्यात आले होते. या काळात राज ठाकरेंनी शरद पवारांची जी मुलाखत घेतली होती त्यामुळे देखील अनेक चर्चा सुरु झाल्या होत्या.

ADVERTISEMENT

4. 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये एकीकडे भाजप आणि शिवसेना एकत्र लढलेली असताना अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या मागणीवरुन भाजप शिवसेनेची युती तुटली. यानंतर शरद पवार आणि संजय राऊत यांच्या पुढाकाराने महाविकास आघाडीचा प्रयोग राज्यात करण्यात आला. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर काही काळातच कोव्हिडमध्ये वर्षभरापेक्षा अधिक काळ हा लॉकडाऊनमध्ये गेला. 23 जानेवारी 2020 ला बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी राज ठाकरेंनी त्यांच्या पक्षाचा झेंडा बदलला. भगवा झेंडा आणि मध्ये राजमुद्रा असा झेंडा मनसेने स्विकारला. त्याचबरोबर राज ठाकरे कट्टर हिंदुत्वाकडे वळत असल्याचा संदेश देखील या काळात देण्यात आला.

हे ही वाचा >> ‘सुप्रिया सुळेंनी मांसाहार करून मंदिरात घेतली सभा’, फोटो दाखवत भाजपचा आरोप

पुढच्या काळात मशिदींवरील भोग्यांचे आंदोलनाने राज ठाकरेंची हिंदुत्वाची भूमिका आणखी प्रखरपणे मांडण्यात आली. या काळात झालेल्या आंदोलनांनंतर राज ठाकरेंना हिंदूजननायक अशी पदवी देखील कार्यकर्त्यांकडून बहाल करण्यात आली. मविआ सरकारच्या काळात राज ठाकरेंनी या सरकारवर जोरदार हल्ला चढवला. निवडणुका युतीत लढलेल्या असताना युती मोडून सरकार स्थापन केल्याचं म्हणत त्यांनी मविआवर टीका केली. याच काळत राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या.

शिंदेंनी बंड केल्यानंतर देखील राज ठाकरेंचा रोख हा उद्धव ठाकरेंवरच अधिक असल्याचे दिसून आले.

5. 2023 च्या पाडव्याच्या सभेत राज ठाकरेंनी शिंदे सरकारवर टीका केली होती. आता कर्नाटकच्या निकालानंतर राज ठाकरे आणि भाजपमधील अंतर वाढत असल्याचं चित्र आहे. कर्नाटकचा निकाल असो की त्र्यंबकेश्वरबाबतची भूमिका असो. राज ठाकरे भाजपच्या विरोधात भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच मधल्या काळात राज ठाकरेंबाबत सावध भूमिका घेणारे भाजपचे नेते आता राज ठाकरेंवर सडकून टीका करत असल्याचं दिसून येत आहे.

त्यामुळे एकेकाळी एकमेकांचे मित्र होऊ पाहणारे भाजप आणि मनसे आता एकमेकांपासून दूर जात असल्याचं चित्र आहे. येणारा काळ हा निवडणुकांचा आहे, त्यामुळे येत्या काळात राज ठाकरे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT