Lok Sabha 2024 Election : राज ठाकरेंच्या मनसेचा महायुतीला कसा होईल फायदा?

मुंबई तक

भाजपच्या आशिष शेलारांनी आज राज ठाकरेंची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली, त्यामुळे राज्यात राजकारण ढवळून निघाले आहे. राज ठाकरे भाजपसोबत गेले तर त्याचा किती फायदा भारतीय जनता पार्टीला होणार हे काळच ठरवणार मात्र खरा तोटा उद्धव ठाकरेंना बसू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.

ADVERTISEMENT

 raj thackeray
raj thackeray
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मनसेचा महायुतीला काय होणार फायदा?

point

राज ठाकरे भाजपसोबत गेले तर काय होणार?

point

राज ठाकरे महायुतीसोबत गेले तर...

Raj Thackeray : ज्या वेळी काँग्रेसने इंडिया आघाडीची स्थापना केली होती, त्या वेळी भाजपची एनडीए आघाडी कमकुवत होताना दिसत होती. पण भारतातील अनेक घटना घडमोडींमुळे एनडीएमध्ये (NDA) मात्र सुधारणा होताना दिसून आली. दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत भाजपकडून (BJP) प्रत्येक पक्षाला एनडीएमध्ये सामील करून घेण्यात येऊ लागले. ज्या पक्षांचे कधी ना कधी भाजपशी संबंध होते. 

राज ठाकरे आणि एनडीए

भाजपच्या याच रणनीतीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेही आता सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  राज ठाकरे यांनी राज्यातील भाजपचे नेते आशिष शेषर यांच्याबरोबर तासभर चर्चा केली आहे. त्यामुळे आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबतच्या बैठकीनंतर राज ठाकरे यांच्याही एनडीएमध्ये सहभाग होणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

नात्यात वितुष्ठ

राज ठाकरे हे ठाकरे घराण्यातील असल्यामुळे त्यांचा एक वेगळा प्रभाव राज्यातील राजकारणावर आहे. ते बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आणि उद्धव ठाकरे यांचे चुलत भाऊ  आहेत. राज ठाकरे यांच्याबद्दल बोलताना सांगितले जाते की, राज ठाकरे हे एकनाथ शिंदे होऊ शकत नाहीत. कारण ते त्यांचे भाऊ आहेत. कारण 2005 साली जेव्हा उद्धव आणि राज यांच्यामध्ये वितुष्ठ आले तेव्हा त्यांनी शिवसेनेवर आणि चिन्हावर कोणताही दावा सांगितला नाही. त्यांनी आपला स्वतंत्र पक्ष निर्माण केला आणि त्याचे नाव ठेवले महाराष्ट्र नवनिर्माण सेना. त्यामध्ये ना ठाकरे घराण्याचे नाव होते, ना शिवसेना होती. 

राजकीय दावेदार नाही

महाराष्ट्रा नवनिर्माण सेना मुंबईत किंवा महाराष्ट्रात कधीच राजकीय दावेदार बनू शकली नाही हे ही कोणी नाकारू शकत नाही. ज्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पहिल्यांदा निवडणूक लढविण्यात आल्या त्यावेळी मनसेचे 13 आमदार निवडून आले होते. मात्र त्यानंतर 2019 च्या निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उतरवून देखील मनसेला फक्त एकाच जागेवर समाधान मानावे लागले होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp