Raj Thackeray vs BJP: ‘दुसऱ्यांचे आमदार न फोडता स्वत:चा..’, राज ठाकरेंनी भाजपला झोडपलं!

रोहित गोळे

ADVERTISEMENT

mns president raj thackeray has strongly criticized bjp from the mumbai goa highway said bjp is breaking mla of other parties maharashtra politics news live
mns president raj thackeray has strongly criticized bjp from the mumbai goa highway said bjp is breaking mla of other parties maharashtra politics news live
social share
google news

Raj Thackeray Mumbai-Goa Highway: पनवेल: मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज (16 ऑगस्ट) पनवेलमध्ये पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना भाजपवर (BJP) तुफान हल्ला चढवला. ‘भाजपने दुसऱ्यांचे आमदार न फोडता त्यांचा पक्ष उभा करायला पण शिकावं..’ अशा शब्दात राज ठाकरे यांनी भाजपला झोडपलं. याचवेळी त्यांनी अजित पवारांवर देखील टीकेची झोड उठवली. महाराष्ट्रातील खराब रस्ते आणि खड्डे यांच्याविरोधात मनसे आंदोलन सुरू करणार आहे. त्याच आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी पनवेलमध्ये मेळावा आयोजत करण्यात आला होता. ज्यामध्ये राज ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. (mns president raj thackeray has strongly criticized bjp from the mumbai goa highway said bjp is breaking mla of other parties maharashtra politics news live)

ADVERTISEMENT

राज ठाकरेंचा भाजपवर तुफान हल्लाबोल…

‘खड्डेच पाहायचे होते तर चंद्रयान चंद्राऐवजी महाराष्ट्रात पाठवायचं होतं..’

‘मी आज आलोय तो फक्त हिरवा झेंडा दाखवायला आलो आहे. या आंदोलनासाठी.. मला अजून कळलेलं नाही जे चंद्रयान गेलं.. चंद्रावर.. त्याचा काय उपयोग आहे आपल्याला? तिथे जाऊन खड्डेच बघायचं आहेत. ते जर महाराष्ट्रात सोडलं असतं खर्चही वाचला असता. हा काही महाराष्ट्रातील कोकणाचा भाग नाही फक्त.. मुंबई-नाशिक रस्त्याची देखील तीच हालत आहे. महाराष्ट्रातील अनेक रस्त्यांची ही हालत आहे. मला फक्त या राज्यातील लोकांचं कौतुक वाटतं.. हे खड्डे काही आज नाही पडलेत.’

हे ही वाचा >> Vijay Wadettiwar : ‘मोदींची अजित पवारांना अट! शरद पवार आले तरच मुख्यमंत्रीपद’

‘म्हणजे 2007 साली या रस्त्याचं काम सुरू झालं. मुंबई-गोवा रस्त्याचं काम सुरू झालं. काँग्रेसचं सरकार होतं. त्यानंतर भाजप-शिवसेनेचं सरकार होतं… नंतर कोणाकोणाचं सरकार आलं? त्याला ना आकार-उकार.. पण एवढी सगळी सरकारं आल्यानंतर देखील या खड्ड्यातून सर्वसामान्य सगळेच जण जात असताना त्याच-त्याच पक्षातील लोकांना मतदान कसं काय तुम्ही करता याचंच जास्त आश्चर्य वाटतं?’

हे वाचलं का?

‘महाराष्ट्रातील जनतेला कधीच वाटत नाही का की, या लोकांना एकदा धडा शिकवावा.. या लोकांना एकदा घरी बसवावं. निवडणुकीच्या तोंडावर येऊन वारेमाप आश्वासनं देतात गोष्टी सांगतात निवडणुका संपल्यावर हातात सत्तेत येते तेव्हा ते म्हणतात की, तेव्हा बोललो होतो.. बघू आता करू.. करू..’ असं म्हणत राज ठाकरे यांनी खड्ड्यांवरून सरकारवर टीका केली.

राज ठाकरेंनी भाजपला झोडपलं, अजित पवारांवरही चढवला हल्ला..

‘त्यादिवशी आमचा अमित कुठे तरी जात होता. तर टोल फुटला.. लगेच भाजपने त्यावर टिप्पणी केली.. काय बोलले होते त्यावेळी.. हा.. रस्ते बांधायला पण शिका आणि टोल उभे करायला पण शिका..’

ADVERTISEMENT

‘मला असं वाटतं भाजपने दुसऱ्यांचे आमदार न फोडता पक्ष उभा करायला पण शिकावं.. लोकांच्या कनपट्टीवर बंदुका ठेवायच्या आणि आतमध्ये आणायचे आणि ती लोकं गाडीत आतमध्ये झोपून जाणार..’

ADVERTISEMENT

‘मी तुला दिसलो का गाडीमध्ये.. मी झोपलो होतो का तिथं?’ (अजित पवारांची मिमिक्री)

हे ही वाचा >> “मला चेकमेट करण्याचा…”, अजित पवार-शरद पवारांची भेट, शिंदेंचं सूचक विधान

‘म्हणजे निर्लज्जपणाचा कळस सुरू आहे महाराष्ट्रात… आपण या सरकारमध्ये का आलेला आहात ‘महाराष्ट्राचा विकास करायचा आहे मला.’ अरे कशाला खोटं बोलताय.. सहा दिवसांपूर्वी ज्या वेळेला पंतप्रधानांनी काढली ना तुमची.. 70 हजार कोटीचा भ्रष्टाचार महाराष्ट्रामध्ये झालाय.. टुणकन लगेच इथे आले सगळेजणं.’

‘कारण भुजबळांनी सांगितलं असणार आता काय-काय असतं.. जाऊ नका.. इथे जाऊ आपण, तिथे नको.. या सगळ्या गोष्टी घडत असताना तुम्हाला ज्या प्रकारचा त्रास होतोय.. रस्त्यांचा होतो, वाहतुकीचा होतोय.. अनेक गोष्टींचा त्रास होतोय.. तरी त्याच-त्याच लोकांना मतदान होतंय..’ असं म्हणत राज ठाकरेंनी भाजपसोबत अजित पवार गटावर देखील टीका केली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT