MP Election: ‘मोदी म्हणजे गॅरंटी…’, पंतप्रधानांना असं का बोलावं लागलं?, म्हणजे…
MP Election and PM Modi: मध्य प्रदेश विधानसभा निवडणुका आता अगदी तोंडावर आल्या आहेत. अशावेळी स्वत: पंतप्रधान मोदींनी या निवडणुकीची जबाबदारी घेतली आहे. पहिल्याच सभेत त्यांनी एक विधान केलं आहे. ज्यामुळे आता उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे.
ADVERTISEMENT

MP Election and PM Modi: अभिजित करंडे, मुंबई: तीन दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे मध्य प्रदेशात (Madhya Pradesh Election) गेले होते. कार्यकर्ता महाकुंभ या कार्यक्रमात मोदींनी सहभाग घेतलेला आणि मध्यप्रदेश निवडणुकीच्या प्रचाराचा नारळही फोडला. मोदींनी कार्यकर्त्यांसमोर बोलताना काँग्रेसवर जोरदार प्रहारही केला. आणि त्याचवेळी ‘मोदी यानी हर घर गारंटी पूरी होने की गारंटी है. जब मोदी गारंटी देता है, तो वो जमीन पर उतरती है। घर-घर पहुंचती है।’ असं म्हणत एका अर्थानं थेट मोदींनी स्वत:साठीच मतं मागितली. (mp election modi is a guarantee why did the prime minister have to say this what is the exact strategy of bjp in madhya pradesh elections)
दुसरीकडे, काँग्रेसवर बोलताना त्यांनी ‘कांग्रेस को अब कांग्रेस के नेता नहीं चला रहे। अब कांग्रेस एक कंपनी बन गई है। नारों से लेकर नीतियों तक हर चीज आउटसोर्स कर रही है। ये ठेका अब कुछ अर्बन नक्सलियों के पास है। कांग्रेस में अब अर्बन नक्सलियों की चल रही है।’ अशा तिखट शब्दात काँग्रेसवर टीका केली.
आता मोदींनी आपलं लक्ष्य थेट मध्य प्रदेशवर का केंद्रीत केलं आहे? मध्य प्रदेश त्यांच्यासाठी इतकं महत्त्वाचं राज्य झालंय का? नेमकं मध्य प्रदेशात आतापर्यंत काय काय झालंय? हे आपण सविस्तर जाणून घेऊया.
PM मोदींची एंट्री आणि मध्यप्रदेशसाठी नवा प्लॅन
परवाचा नरेंद्र मोदी यांचा सहा महिन्यातला हा सातवा मध्य प्रदेश दौरा होता. अर्थात त्याचं कारणही महत्त्वाचं आहे ते म्हणजे मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणुका कुठल्याही क्षणी जाहीर होऊ शकतात.