Rohit Pawar : ‘पक्ष, चिन्ह आम्हालाच मिळणार’, निवडणूक आयोगाच्या निकालाआधी रोहित पवारांचा दावा
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेलांनी राष्ट्रवादीवर दावा केल्यानंतर त्यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांना भाजपसारखा अहंकार आल्याची टीका त्यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
Rohit Pawar : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले. तर त्यानंतर काही दिवसांनी विरोधी बाकावर असणाऱ्या अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देऊन तेही सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. राष्ट्रवादीच्या घड्याळ्याचे दोन भाग झाल्यानंतर आता पक्षातील प्रत्येक जण त्या घड्याळ्यावर दावा दाखल करत आहेत. त्यावरून आता राजकारण तापले आहे. (mp praful patel claimed ncp party and symbol mla rohit pawar criticized for arrogance)
ADVERTISEMENT
पटेलांना पक्ष आणि चिन्हाचा विश्वास
पक्षाचे चिन्ह्यावरून वाद चालू असतानाच खासदार प्रफुल्ल पटेल यांनी घड्याळ चिन्हाबाबत दावा करताना म्हटले आहे की, येणाऱ्या काळात अजित पवारांच्या नेतृत्वाखाली पक्ष आणि चिन्ह आम्हाला मिळणार असल्याचे त्यांनी विश्वासाने सांगितले आहे. त्यावरूनच आता राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटातील नेते आणि आमदार रोहित पवार यांनी त्यांना म्हटले आहे की, पक्षाचं चिन्हं असो किंवा नसो आमच्याकडे शरद पवार असल्याचे त्यांनी पटेलांना ठणकावून सांगितले आहे.
हे ही वाचा >>Pankja Munde : ‘हे तीनही नेते प्रचंड तणावामध्ये’, पंकजाताईंनी समस्यांचा डोंगर दाखवला
निवडणूक आयोग भाजपचे
खासदार प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हाविषयी दावा करताना त्यांनी आपल्या राजकारणाचा अनुभवाचा दाखला दिला आहे. ते म्हणाले की, आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडलेले दिसत असले तरी त्याविषयी आम्हाला विश्वास आहे. येणाऱ्या काळात निवडणूक आयोग निकाल देईल तेव्हा मात्र त्यांच्याकडून आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाकाळी पक्ष आणि चिन्ह हे आम्हालाच मिळणार असल्याचे त्यांनी विश्वासाने बोलून दाखवले आहे.
हे वाचलं का?
प्रफुल्ल पटेलांना अहंकार
खासदार प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर दावा करताच रोहित पवारांनीही त्यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रफुल्ल पटेलांना आता भाजपचा अहंकार आला आहे. त्यामुळे निवडणूक आयोग निकाल देईल तेव्हा देईल मात्र निवडणूक आयोग आपलचं ऐकतात हे भाजपाचे नेते सांगतात त्यामुळे प्रफुल्ल पटेलांनाही तसाच अहंकार आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा >> Maratha Morcha : वटहुकूमवरून डिवचलं, ठाकरेंनी फडवणीसांचा अभ्यासच काढला, ‘ज्ञान इतकं तोकडं…’
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT