'हुकूमाशाहीच्या पराभवासाठी आंबेडकरांनी 'मविआ'सोबत यावं', राऊतांनी जनतेची भावना सांगितली
देशातील लोकशाही, संविधानाच्या बचावासाठी प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबत यावं अशी इच्छा मविआची तर आहेच मात्र त्याच बरोबर जनतेच्या मनातील भावना असल्याचेही खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

हुकूमशाहीच्या पराभवासाठी आंबेडकरांची सोबत

संविधान वाचवण्यासाठी मविआची धडपड
Mahavikasa Aghadi: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. एकीकडे भाजपने आज पहिली यादी जाहीर केली आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडी (MAhavikas aghadi)आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये (VAnchit Bahujan Aghadi) अजून अंतिम चित्र स्पष्ट झालेलं दिसत नाही. त्यामुळे आज पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना हाक देत त्यांनी महाविकास आघाडीसोबत यावं अशी राज्याराज्यातील जनतेची भावना असल्याचेही त्यांनी सांगितले.
युतीची चर्चा सुरू
खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील सरकारवर जोरदार हल्लाबोल करत निवडणुकीवरून निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीबरोबर युती करण्यासंदर्भातील चर्चा सुरू असून त्यासाठी आतापासूनच मविआच्या कार्यकर्त्यांपासून वंचितचे कार्यकर्तेही कामाला लागले असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
एकदिलानं युतीचं काम
संजय राऊत यांनी वंचित आणि मविआच्या आघाडीविषयी बोलताना सांगितले की, 'ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे अनेक कार्यकर्ते एकदिलानं काम करताना दिसत आहेत.
हुकूमशाहीचा पराभव
युतीचा अंतिम निर्णय कधी होईल तेव्हा होईल मात्र आतापासूनच सगळे कार्यकर्ते एकत्र काम करत आहेत. त्यामुळेच राज्यातील लोकांची, आंबेडकरी जनतेची अशी इच्छा आहे की प्रकाश आंबडेकर यांनी हुकूमशाहीचा पराभव करण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी त्यांनी महाविकास आघाडीसोबत यावं अशी जनतेची भावना असल्याचंही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.