Vinayak Raut: 'राणेंचा वापर करायचा आणि कचऱ्याच्या...', राऊतांची बोचरी टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

vinayak raut criticizes narayan rane
vinayak raut criticizes narayan rane
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राणेंचा वापर करायचा आणि नंतर कचऱ्याच्या डब्यात...

point

भाजपने राणेंची जागा दाखवून दिली

point

राणेंना भाजपची नीती समजली

Shiv sena: भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेकडून राज्यसभेचे उमेदवार (Rajya sabha Candidate) जाहीर करण्यात आले. त्यानंतर राज्यातील राजकारण अनेक कारणांनी ढवळून निघाले. भाजपने (BJP) राज्यसभेची उमेदवारी जाहीर करताना नुकताच भाजपवासी झालेल्या अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची उमेदवारी पक्की केली. त्यामुळे आता नारायण राणे यांच्यावर कसा अन्याय झाला आहे, त्यांचा पत्ता कट कसा झाला आहे यावर चर्चा रंगली आहे. राज्यसभेच्या उमेदवारीवरूनच ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी नारायण राणेंवर (Minister Narayan Rane) बोचरी टीका करत आता त्यांना भाजपची नीती काय असते त्याचा प्रत्यत आला असले असा खोचक सवालच त्यांनी केला आहे.

ADVERTISEMENT

राणेंचा वापर करायचा आणि...

ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका करताना बोचरी टीका केली आहे. 'नारायण राणे यांची परिस्थिती म्हणजे जोपर्यंत वापर आहे तोपर्यंत वापर करायचा नंतर कचऱ्याच्या डब्यात फेकून द्यायचं' अशी परिस्थिती त्यांची झाली असल्याची टीका त्यांनी केली आहे. 

राणेंना जागा दाखवली

भाजपमध्ये काल आलेल्या अशोक चव्हाण यांना भाजपने उमेदवारी दिली आहे, तर नारायण राणेंचा पत्ता कट केला आहे. त्यामुळे आता त्यांना त्यांची जागा समजली असेल असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे. या जागा वाटपावरूनच भाजपची नीती काय असेल ते त्यांनी समजून घ्यावी असा सल्लाही खासदार राऊत यांनी राणेंना दिला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >> "इलेक्टोरल बॉन्ड घटनाबाह्य", मोदी सरकारला सुप्रीम झटका

सामान्य कार्यकर्त्याला डावलले

खासदार विनायक राऊत यांनी त्यांच्यावर बोलताना सांगितले की, 'राज्यसभेच्या जागावाटपा वरून नारायण राणे यांना त्यांची जागा त्यांनी दाखवून दिली आहे. या सगळ्यामध्ये दुर्देवी हे आहे की, अशाक चव्हाण यांना राज्यसभेची जागा देण्यात आली. मात्र त्यापेक्षा भाजपने ही जागा एखाद्या प्रामाणिक कार्यकर्त्याला दिली असती तर ते भाजपला शोभले असते' अशा शब्दात त्यांनी भाजपचाही समाचार घेतला आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT