'मुलांना जन्म.. करुणासोबत लग्नासारखे संबंध, पोटगी द्यायची!' धनंजय मुंडेंना दणका, कोर्टाचा निकाल जसाच्या तसा..
न्यायालयाचा लेखी आदेश बुधवारी समोर आला. यामध्ये करूणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध लग्नासारखे आहेत असं म्हटलंय. करूणा यांनी दोन मुलांना जन्म दिला आहे आणि एकत्र घरात राहिल्याशिवाय ते शक्य नाही असं न्यायालयाने म्हटलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळली
याचिका फेटाळताना न्यायालयाने काय म्हटलं?
करूणा मुंडे, मुलांना किती रुपये मिळणार?
Karuna Sharma : एकीकडे बीडमध्ये घडलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे धनंजय मुंडे यांच्याकडे संशयाची सुई आहे. तर दुसरीकडे करूणा मुंडे यांच्यासोबतच्या वादामुळेही धनंजय मुंडे अडचणीत आहे. हा वाद आता न्यायालयात असून, सध्या हा खटला चांगलाच चर्चेत आहे. 5 एप्रिलला पार पडलेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने अनेक महत्वाची निरीक्षणं नोंदवली आहेत. यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत मात्र चांगलीच वाढ झालेली आहे.
माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मुंबई कोर्टाकडून मोठा दणका बसला आहे. त्यांची पहिली पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या करुणा मुंडे यांच्याशी असलेले संबंध "विवाह स्वरूपाचे" असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येतं, असं न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे करूणा यांना घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत त्यांना सवलत मिळण्याचा अधिकार आहे.
हे ही वाचा >> "माझ्या भावाला सोडा, काही करू नका...", धनंजय देशमुखांनी कुणाला फोन केले? जबाबात समोर आलं
अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेख अकबर शेख जाफर यांनी शनिवारी झालेल्या सुनावणीत हे निरीक्षणं नोंदवले. करुणा मुंडे नावाच्या महिलेला अंतरिम देखभाल खर्च देण्याच्या पदाधिकार्यांच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या धनंजय मुंडेंची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.
काय आहे धनंजय मुंडेंचा दावा?
- धनंजय मुंडे यांनी दावा केला होता की, करुणा मुंडेंशी माझं लग्न झालं नव्हत. त्यावर न्यायालयाने म्हटले की, ती कायदेशीररित्या विवाहित पत्नी आहे की नाही हे योग्य व्यवस्थेनं ठरवावं.










