Mumbai Tak Chavadi: ‘विधानपरिषदेचा फॉर्म भरलेला, शेवटच्या क्षणी सांगितलं आता…’, पंकजा मुंडेंचा गौप्यस्फोट

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbai tak chavadi filled form for vidhan sabha election but party told to withdraw form at last minute pankaja munde big secret explosion
mumbai tak chavadi filled form for vidhan sabha election but party told to withdraw form at last minute pankaja munde big secret explosion
social share
google news

Pankaja Munde Vidhan Parishad: मुंबई: भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आज (27 सप्टेंबर) मुंबई Tak च्या ‘चावडी’वर (Mumbai Tak Chavadi) बोलताना यांनी विधानपरिषद निवडणुकीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. ‘विधानपरिषदची दुसरी निवडणूक आली तेव्हा उमेदवार म्हणून माझा अर्ज वैगरे भरून घेतला होता. मला म्हणाले की, सकाळी फॉर्म भरायला या. मला सकाळी पक्षाकडून फोन आला की, तुम्ही फॉर्म नका भरू..’ असा गौप्यस्फोट पंकजा मुंडे यांनी केला आहे. (mumbai tak chavadi filled form for vidhan sabha election but party told to withdraw form at last minute pankaja munde big secret explosion)

पाहा मुंबई Tak च्या चावडीवर पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या:

मी मध्यप्रदेशची सहप्रभारी आहे. जवळपास पूर्ण जून महिना मोदी@9 चे कार्यक्रम तिथे केले. पण मी आता जी दोन महिन्यांची सुट्टी घेतली त्यात मी ऑनलाइन बैठका घेतला. फक्त एका बैठकीला नव्हते मी. नंतर काही बैठकीचा काही निरोप मला आले नाही. आला तर मी जाईन.

मला जे दिलं त्या चाकोरीत मी काम करते. निवडणुकीत मी पराभूत झाले.. पक्षाने विचारलं कुठे काम करायचं मी म्हटलं मला राष्ट्रीय पातळीवर काम करायचं आहे. त्यांनी मला मध्यप्रदेशमध्ये सहप्रभारीची जबाबदारी दिली. तिथे मी काम केलं. मला जी जबाबदारी नाही दिली तिथे जाणं हे भाजपचे संस्कार नाहीत. कुठलंही पद निर्माण होतं तेव्हा चर्चा होते की, पंकजा मुंडेंना संधी देण्यात येईल. असं बोललं जातं. नाही मिळालं की, त्यावरही चर्चा होते.

मी जी सुट्टी घेतली त्याचं कारण काय होतं की, या महाराष्ट्रात पहिल्यांदा असं घडलं की, एका युतीमुळे एका महत्त्वाच्या नेत्याच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. कारण तिच्या मतदारसंघावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं. दुसरी अशी बातमी आली की, पंकजा मुंडे यांना भेटील, त्यांना भेटली… म्हणजे सतत पाच वर्ष पंकजा मुंडे नाराज, खदखद आहे. असं म्हटलं जात आहे. या सगळ्यापासून लांब जाण्यासाठी मी राजकीय सुट्टी घेतली होती.

जो शपथविधी झाला त्यानंतर मी काही पत्रकार परिषद घेतली नाही. विधानपरिषद निवडणूक झाली पण तेव्हा तर मी काही पत्रकार परिषद घेतली नाही. मी काहीच बोलली नाही. आता ही जेव्हा घटना घडली तेव्हा दोन गटांचा शपथविधी झाला. यानंतर चर्चा कशी निर्माण झाली? आता या चर्चेला सामोरं जाणं माझं कर्तव्य आहे.

हे ही वाचा >> NCP Split : राष्ट्रवादी कुणाची? निकालाआधीच अजित पवारांचं मोठं विधान

 

मला ऐनवेळी सांगितलं की, विधानपरिषदेचा फॉर्म भरायचा नाही..

निवडणूक हरणं म्हणजे नेता संपतो असा अर्थ नाही. एका व्यक्तीचा स्वत:च्या मतदारसंघात प्रभाव असतो.. नैसर्गिक आहे. पण एका व्यक्तीचा 50 मतदारसंघात प्रभाव असतो ही नेतृत्व आहे. गोपीनाथ मुंडेसुद्धा पराभूत झाले होते 1984 साली. त्यावेळी पक्षाने लगेच त्यांना प्रदेशाध्यक्ष केलं होतं त्यांना. तेव्हा पक्षाला माहीत होतं की, मुंडे हे फक्त रेणापूरचे नाहीत तर महाराष्ट्राचे आहेत.

जेव्हा 2019 मध्ये पंकजा मुंडे निवडणूक लढत होती तेव्हा ती प्रदेशाध्यक्ष नव्हती, राज्याची भावी मुख्यमंत्री नव्हती. तरी राज्यात सर्वाधिक सभा मुख्यमंत्री जे जाहीर झाले त्यांच्या पाठोपाठ मीच घेतल्या होत्या.

मला रोज वॉररुममधून फोन होते. सगळ्यात जास्त सभाची मागणी.. पंकजाताई.. चंद्रकांतदादांचे फोन.. आता हे जे काम मी करत होते ते काय परळीपुरतं करत होते? नाही ना..? मी राज्याकरिता करत होते. मग माझ्या परळीच्याच पराभवाचं आकलन होईल? राज्यातील जो माझा सहभाग होता त्याचं काय?

भाजपची एक संस्कृती आहे.. मी निवडणुकीत पराभूत झाल्यावर मी त्याचं दायित्व स्वीकारलं.. मी ते दुसरं कोणावर ढकललं नाही. पण जेव्हा विधानपरिषदची निवडणूक आली तेव्हा मला माहीत होतं की, अशी पद्धत नाही. मग तेव्हा मला म्हटलं गेलं की, ताई तुम्ही नेत्या आहात तुम्ही असायला पाहिजे. तुम्ही तयारी ठेवा.. मला राज्याच्या नेत्यांनी सांगितलं. मी म्हटलं ठीक आहे.. तयारी म्हणजे काय असते. फॉर्म भरा, कागदपत्र तयार ठेवा. नंतर सांगितलं जे निवडणूक हरले त्यांना देणार नाही. मी काही मागायला गेले नाही.. मी म्हटलं ठीक आहे.. मी पक्षाची शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे.

राज्यसभेची निवडणूक आली तेव्हा भागवत कराडांचा फॉर्म भरायला मी स्वत: गेले होते. त्यानंतर पुन्हा विधानपरिषदची दुसरी निवडणूक आली तेव्हा उमेदवार म्हणून माझा अर्ज वैगरे भरून घेतला होता. मला म्हणाले की, सकाळी फॉर्म भरायला या. मला सकाळी पक्षाकडून फोन आला की, तुम्ही फॉर्म नका भरू.. त्यानंतरही मी विचारलं नाही का भरायचं नाही. मी म्हटलं ठीक आहे, जशी तुमची इच्छा. आता याची कारणं काय? हे मी विचारलं नाही.

परळी विधानसभा मतदारसंघावरचा दावा सोडला का?

माझं म्हणणं आहे की.. हा शपथविधी झाला.. त्याचा निर्णय वरच्या लोकांनी घेतला. त्यांनी माझ्याशी चर्चा केलेली नाही. मी आणि धनंजय काही पक्षाचे प्रमुख नेते नाहीत की, तिकीट वाटू. आम्ही दोघंही याबद्दल चर्चा केलेली नाही. पक्षश्रेष्ठीने काही तरी ठरवलेलं असेल. तेव्हा बघू काय करायचं

धनंजय मुंडेंसमोर खरं आव्हान कोणाचं शरद पवार की पंकजाताईंचं?

धनंजय मुंडेंसमोर काय आव्हानं आहेत हे पाहायला मला वेळ नाही. एवढी आव्हानं माझ्यासमोर आहेत. तुम्ही जर निवडणुकीचं गणित पाहिलं तर भाजपचे प्रमुख तीन नेते पाहा त्यांना पडलेली मतं पाहा.. 2014 आणि 2019 मधील.. आणि विभाजन झालेली मतं पाहा.. मला 15 हजार मतं विभाजीत झाली असती. तिसरा उमेदवार असता तर मला निवडणूक सहज होती. त्यामुळे मी आव्हान नव्हते असं नाही.

मी पडले तरी आव्हान आहेच आणि राहीलच.. आमच्या दोघांमध्ये एकमेकांना आव्हान देण्यापेक्षा त्यांना त्यांचेच आव्हान राहणार आहेत आणि मला माझे आव्हान राहणार आहेत

‘मनातील मुख्यमंत्री’ या विधाननंतर भाजपने तुमचे पंख कापले का?

माझ्या ज्या मनात वेदना आहेत… ज्या मलाही कळल्या नाहीत त्या तुम्हाला कळल्या आहेत असं मला वाटतं. पहिले तर एक गोष्ट की.. मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री या विषयाचा त्रास झाला का? हा वेगळाच विषय आहे. पण.. हे मी बोलले नाही.. यावर मी अनेकदा स्पष्टीकरण दिलं आहे. जर असं असेल जे तुम्ही बोलताय तर हे काय चांगलं आहे का?

मी ते बोललेच नाही ना.. मी डिफेंड करत राहिले ना.. मी असं म्हटली नाही.. मी असं म्हटली नाही.. आता हे म्हणाल्यावर माझ्या डोक्यात ट्यूब पेटली. मी फक्त तेवढं जर म्हटले असेल तर त्यामुळे असं काही होत असेल तर ते चांगलं नाही.

म्हणजे मत तयार झालं आहे. आता ते काही मी तयार केलेलं नाही. मी काही ग्रामपंचायतची सदस्य नव्हते. मी म्हटले नाही मनातील मुख्यमंत्री.. पण आपण समजू ढोबळमानाने की मी म्हटले ते वाक्य.. तर काय?

म्हणजे असं काय आभाळ कोसळलंय की, त्या माणसाला आयुष्यातून उठवायचं..? असं नसतं ना.. राजकारणातून.. असं जर मत तयार झालं असेल.. हे खरं आहे की नाही यावर मी निर्णय देऊ शकत नाही. पण हे जे म्हणतायेत तसं जर परसेप्शन असेल तर ते परसेप्शन चांगलं गेलेलं नाही.

हे ही वाचा >> Ajit Pawar: दादा मुख्यमंत्री? मोहित कंबोज यांचे बोचणारे 8 शब्द, Tweet का केलं डिलीट?

 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

निवडणुकीसाठी पक्षाने तिकीट दिलं नाही तर?

मला पक्ष तिकीट का देणार नाही? माझ्यासारख्या माणसाला तिकीट न देणं हे कोणत्याही पक्षासाठी चांगला निर्णय नाही. जर तसा निर्णय घेतला तर त्याचं उत्तर त्या लोकांना द्यावं लागेल. दुसरं म्हणजे मी कोणताही दुसरा मतदारसंघ शोधत नाहीए. लोकं म्हणतायेत की, इथे लढा-तिथे लढा..

लोकसभेची निवडणूक की विधानसभेची निवडणूक लढवणार?

निवडणूक ही आवडते ती आवडते असं काही नसतं.. ते त्या वेळच्या परिस्थितीनुसार ठरत असतं. पण मी हे स्पष्ट केलं आहे की, प्रीतमला विस्थापित करून मी प्रस्थापित होणार नाही. पण निवडणुकीबाबत विचार केलेला नाही.

प्रीतमच्या बाबतीत जो निर्णय पक्ष घेईल त्याबाबत मला नाही पटू शकत असं होऊ शकतं. कारण 10 वर्ष खासदार असलेल्या मुलीला घरी बसवून मी माझं राजकारण करणं त्या सगळ्या 50 मतदारसंघात जे माझ्यावर प्रेम करतात. जिथे लोकांना फरक पडतो, त्यांना वाटेल की ही स्वार्थी बहीण आहे. हिने आपल्या बहिणीला घरी बसवून स्वत:चं राजकारण साधलं. आताचा काळात स्वत:ला कसं पद मिळेल हे बघणाऱ्या राजकारण्याची तुम्हाला सवय झाल्यामुळे अशा वक्तव्याला तुम्ही वेगळ्या अर्थाने घेतलं.. की पक्षाबद्दल पंकजा अवज्ञा करतायेत.. तर नाही. पंकजा मुंडे एखाद्या पदाचा कदाचित त्याग करून एक भूमिका घेतात हा त्याचा अर्थ आहे.

अशी जोरदार फटकेबाजी पंकजा मुंडे यांनी मुंबई तकच्या चावडीवर केली. त्यामुळे आता पंकजा मुंडेंच्या विधान आणि गौप्यस्फोटाबाबत भाजप नेतृत्व नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT