Marashtra MLC Election : अजित पवारांना धक्का! राष्ट्रवादीच्या नेत्याचा ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा

मुंबई तक

Nashik Teacher Constituency Election : विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारानेच उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे.

ADVERTISEMENT

अजित पवार, नरहरी झिरवळ, उद्धव ठाकरे.
नरहरी झिरवळांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात भूमिका.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणूक

point

नरहरी झिरवळ यांचा उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा

point

महायुतीच्या विरोधात घेतली भूमिका

Narhari Zirwal : विधान परिषद निवडणुकीत अजित पवारांच्या आमदारानेच उद्धव ठाकरेंच्या उमदेवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार संदीप गुळवे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. (Narhari Zirwal has extended Support to Shiv Sena UBT Candidate Sandip Gulve)

विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होत आहे. या मतदारसंघातून तीन पक्षाचे उमेदवार आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने संदीप गुळवे यांना उमेदवारी दिली आहे.

हेही वाचा >> महायुतीत 'बिघाडी'! उद्धव ठाकरे-काँग्रेसने घेतले जुळवून 

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने किशोर दराडे यांना उमेदवारी दिलेली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही महेंद्र भावसार यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देणं अपेक्षित असताना झिरवळ यांनी गुळवे यांना पाठिंबा जाहीर केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

गुळवेंनी घेतली भेट, झिरवळांनी जाहीर केला पाठिंबा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवळ यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत संदीप गुळवे यांनी भेट घेतली होती. त्यानंतर झिरवळ यांनी त्यांना पाठिंबा जाहीर केला. सर्व कार्यकर्त्यांनी संदीप गुळवे यांचे काम करावे, अशा सूचनाही झिरवळ यांनी दिल्या आहेत. कौटुंबिक संबंधांमुळे गुळवे यांना पाठिंबा जाहीर केल्याचे झिरवळ यांनी म्हटले आहे.

हेही वाचा >> 11 जागांसाठी निवडणूक जाहीर, ठाकरे-पवारांची विधानसभेपूर्वी 'परीक्षा' 

शिंदेंची शिवसेना-अजित पवारांची राष्ट्रवादी आमने-सामने

नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीतील दोन पक्षच आमने-सामने आले आहेत. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे संदीप गुळवे हे मैदानात आहे. काँग्रेसनेही या मतदारसंघातून उमेदवार दिला होता, पण ठाकरे आणि काँग्रेसने तोडगा काढला. त्यानंतर ठाकरेंनी कोकण पदवीधर मतदारसंघातून, तर काँग्रेसने नाशिकमधील उमेदवार मागे घेतला.

 

हे वाचलं का?

    follow whatsapp