Narhari Zirwal : “25 आमदार राजीनामा देणार, सरकार पडणार”, पुन्हा भूकंप?
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाला आदिवासी म्हणून आरक्षण देण्याची मागणी केल्यानंतर आदिवासी आक्रमक झाले आहेत. नरहरी झिरवळ यांनी २५ आदिवासी आमदार राजीनामा देतील, असा इशारा दिला आहे.
ADVERTISEMENT

Narhari zirwal News Marathi : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या मागणीने नवा आरक्षण वाद निर्माण झाला आहे. पडळकरांच्या विरोधात आदिवासी समुदाय आक्रमक झाला असून, आता आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यातच विधानसभेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवळ यांनी मोठं विधान केलं आहे. झिरवळांनी थेट सरकार पडणार, असा उल्लेख केल्याने त्यांच्या विधानाची आता चर्चा सुरु झालीये.
गोपीचंद पडळकर यांच्या मागणीला विरोध करण्यासाठी नाशिकमध्ये आदिवासींनी आंदोलन केले. या आंदोलनात आदिवासी समुदायातील आमदारही उपस्थित होते. त्याचवेळी झिरवळ यांनी हे विधान केलं आहे.
नरहरी झिरवळ काय म्हणाले?
आमदारांच्या राजीनाम्याबद्दल बोलताना विधानसभेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवळ नेमकं काय म्हणाले, ते बघा…
हेही वाचा >> भाजपने काय दिली होती ‘ऑफर’?; शरद पवारांच्या गौप्यस्फोटाने राजकारणात खळबळ
झिरवळ म्हणाले, “25 आमदार राजीनामे देतील. पक्षाकडे आमदाराकीचा राजीनामा दिला… एकाच पत्रावर आम्ही सगळ्या पक्षांना देऊ. आम्ही 25 जणांनी मनावर घेतलं, तर सरकारच राहत नाही. कोणतंही असलं तरी राहत नाही. आम्ही सरकारमध्ये आहोत. पण, सरकार हे नंतर आहे. आमदार हे नंतर आहे. पहिला आहे तो समाज. आम्ही आदिवासी आहोत.”