सुषमा अंधारेंना राज ठाकरे स्टाईल अंगलट? मिटकरी भडकले, थेट ठाकरेंकडे तक्रार
सुषमा अंधारेंनी महाप्रबोधन सभेत राज ठाकरे स्टाईलमध्ये व्हिडिओ लावून भाजप, शिंदे गटावर हल्ला चढवला. पण त्यावरून मिटकरींनी अंधारेवर हल्ला चढवलाय. नेमका काय व्हिडिओ लावला आणि त्यावरून मिटकरी का भडकले तेच आपण जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) महाप्रबोधन सभेतल्या गर्दीवरून भाजप आणि शिंदे गटाच्या निशाण्यावर आल्यात. त्याचवेळी आता महाविकास आघाडीतल्या आमदारानेही अंधारेंनी लावलेल्या व्हिडिओवरून जोरदार हल्ला चढवलाय. अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) अंधारेंची खिल्ली उडवली. एवढंच नाही, तर थेट उद्धव ठाकरेंकडे (Uddhav Thackeray) तक्रारही केलीय. अंधारेंनी महाप्रबोधन सभेत राज ठाकरे स्टाईलमध्ये व्हिडिओ लावून भाजप, शिंदे गटावर हल्ला चढवला. पण त्यावरून मिटकरींनी अंधारेवर हल्ला चढवलाय. नेमका काय व्हिडिओ लावला आणि त्यावरून मिटकरी का भडकले तेच आपण जाणून घेऊयात. (ncp amol mitkari angree on sushma andhare and complained udhhav thackeray)
ADVERTISEMENT
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंची (Sushma Andhare) महाप्रबोधन यात्रा संपली, तरी वाद काही केल्या संपायचं नाव घेईना. बीडमध्ये समारोपाच्या सभेत अंधारेंनी राज ठाकरेंच्या स्टाईलमध्ये लाव रे तो व्हिडिओ म्हणत भाजप आणि शिंदे गटावर हल्ला चढवला. पण यावरून आता महाविकास आघाडीमध्येच बेबनाव निर्माण झालाय. अंधारेंनी पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख करत भर सभेत व्हिडिओ लावला. राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करताना हिंदुत्व धोक्यात येत नाही का, असा सवाल करत अंधारेंनी भाजपवर निशाणा साधला. नेमकं काय झालं, ते तुम्हीच बघा.
हे ही वाचा : राणे-सामंतांनी सुषमा अंधारेंना डिवचलं, पण ठाकरे गटाने…
अंधारेंनी (Sushma Andhare) व्हिडिओ लावून भाजपच्या हिंदुत्वावर हल्ला चढवला. पण निशाणा भाजपवर, फडणवीसांवर साधला असला, तरी यातून राष्ट्रवादीला डिवचलं का, असा मुद्दा समोर आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी ट्विट करत व्हिडिओ लावण्याचा इशारा दिलाय. कोणाच्या नावाचा थेट उल्लेख करत मिटकरी लिहितात, आदरणीय उद्धवजी,आपल्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे,विनंती ही की आपल्या पक्षातील वाचाळविरांना आवर घालावा. राष्ट्रीय कॉग्रेस पक्ष संकट काळात आपल्या सोबत उभा राहिलाय. गल्लीतील टुकार “दादाहो “राष्ट्रवादी पक्षाबद्दल बोलत असतील तर आम्हालाही VDO लावावे लागतील.
हे वाचलं का?
अजित पवारांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणाऱ्या मिटकरींनी विषय थेट उद्धव ठाकरेंकडे नेलाय. एवढंच नाही, तर आम्हालाही व्हिडिओ लावावे लागतील, असा इशाराही दिलाय. मिटकरींनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना टॅगही केलंय. आता ठाकरे यावर काय भूमिका घेतात हे बघावं लागले.
हे ही वाचा : राज्यपालांनीच बेकायदेशीर निकाल दिला, तेथे सरकार कायदेशीर कसे?; संजय राऊतांचे रोखठोक सवाल
याआधीही सुषमा अंधारेंनी थेट शरद पवारांसमोरच विरोधी पक्षनेत्याबद्दल तक्रार केली होती. तेव्हा अमोल मिटकरींनी अंधारेंची रडरागिणी असं म्हणत खिल्ली उडवली होती. आता पुन्हा एकदा मिटकरींनी थेट हल्ला चढवलाय. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरू झालीय. त्याचवेळी नेते, कार्यकर्त्यांमधला बेबनावही समोर यायला सुरवात झालीय. त्यामुळे या सगळ्यांवरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT