Maratha Morcha: ‘ते कर्तबगार गृहमंत्री होते..’ शरद पवारांनी ‘असे’ टोचले देवेंद्र फडणवीसांचे कान
Maratha Morcha and Sharad Pawar: मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्यानंतर त्यांच्या भेटीला गेलेल्या शरद पवारांनी पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांना अत्यंत शेलक्या शब्दात सुनावलं आहे.
ADVERTISEMENT

Maratha Morcha and Sharad Pawar vs Devendra Fadnavis: जालना: गोवारी हत्याकांड झालं तेव्हा शरद पवार (Sharad Pawar) हे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी राजीनामा दिला नाही. असं विधान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जालना मराठा मोर्चावर (Maratha Morcha) झालेल्या लाठीहल्ल्याबाबत (Lathihalla) प्रतिक्रिया देताना केलं होतं. ज्यानंतर आज (2 सप्टेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जालनातील पत्रकार परिषदेत बोलताना याच मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीसांचे कान टोचले आहे. (ncp chief sharad pawar taunts dcm devendra fadnavis over resignation after baton attack on jalna maratha morcha protesters maharashtra politics news marathi)
जालन्यातील अंतरवाली सराटी येथे काल (1 सप्टेंबर) रोजी मराठा आंदोलकांवर पोलिसांनी तुफान लाठीहल्ला चढवला होता. ज्यानंतर शरद पवार यांनी आज तात्काळ तिथे जाऊन आंदोलक आणि जखमींची भेट घेतली. याच भेटीनंतर पवारांनी पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर शेलक्या शब्दातून टीका केली. तसंच राजीनाम्याच्या मुद्द्यावरुन देखील सुनावलं.
शरद पवारांनी बोचऱ्या शब्दात फडणवीसांना सुनावलं…
‘मी जखमी लोकांना भेटलो आणि आंदोलकांना भेटलो.. ते सतत एक गोष्ट सांगत होते की, आमचं सगळं व्यवस्थित सुरू होतं. पण वरून आदेश आला. फोन आला कोणाचा तरी आणि पोलिसांचा दृष्टीकोन बदलला.. आता हा कोणाचा फोन आला ते आंदोलकांना माहीत नव्हतं. पण बाहेर जे लोक घोषणा देत होते ते राज्याच्या गृहमंत्र्यांसंबंधी घोषणा देत होते. पण त्यासंबंधीची खात्रीलायक माहिती माझ्याकडे नाही.’
हे ही वाचा >> Shiv Sena UBT: ‘जे भा%$# आहेत त्यांना तुम्ही घेतलंय…’, उद्धव ठाकरेंची जीभ घसरली
‘एक शंका अशी आहे लोकांना की, या महत्त्वाच्या प्रश्नाकडे संपूर्ण (मुंबईतील INDIA बैठकीबाबत) देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. ते कुठे तरी विचलित करावं त्यासाठी असा काय उद्योग केला की काय? अशी शंका काही लोकांच्या मनात आहे. पण त्याची खात्रीशीर माहिती माझ्याकडे नाही.’