Ajit Pawar आणि आव्हाडांमधील वाद विकोपाला, पवारांबाबतच्या 'त्या' विधानावरुन राडा

मुंबई तक

Ajit Pawar vs Jitendra Awhad: अजित पवारांनी बारामतीत शरद पवारांबाबत केलेल्या एका विधानावरून आमदार जितेंद्र आव्हाड हे फारच संतापले आहेत. त्यावरून दोघांमध्ये सध्या ट्विटर वॉर रंगलं आहे.

ADVERTISEMENT

Awhad Criticized ajit pawar
अजित पवार आणि आव्हाडांमधील वाद विकोपाला
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अजित पवारांवर आव्हाड संतापले

point

अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण

point

अजितदादा वि. आव्हाड.. ट्विटर वॉर

Ajit Pawar vs Jitendra Awhad NCP Politics: मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत भाषणात केलेल्या एका वक्तव्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात वाद सुरु आहे. अजित पवार यांनी भाषण करताना कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं की, 'शेवटची निवडणूक आहे असं सांगतील आणि भावनिक आवाहन करतील. पण तुम्ही त्याला बळी पडू नका. तसेच शेवटची निवडणूक कधी येईल हे मला माहिती नाही,' असं अजित पवार म्हणाले होते. (ncp politics controversy between ajit pawar and jitendra awhad broke out criticism on ajit pawar after his statement about sharad pawar)

नेमका वाद काय?

अजित पवारांनी नाव न घेता ही टीका शरद पवार यांच्यावर केली होती. त्यानंतर आता या वक्तव्याचे पडसाद उमटू लागले आहेत. 'मला अजित पवारांबरोबर काम केल्याची लाज वाटते' असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

'आज अजित पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना हद्द ओलांडली आहे. एखाद्या माणसाच्या मृत्यूची प्रार्थना करणं, याचना करणं हे माणुसकीला शोभणारं आहे काय? याचा विचार अजित पवार यांनी जरुर करावा.' असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर टीका केली.

'आपल्या काकाच्या मृत्यूची वाट बघताय, हे राजकारण आहे का अजित पवार? भावनिक आवाहन करतील, ही शेवटची निवडणूक असेल. काय माहीत शेवटची निवडणूक कधी असेल? शरद पवार आहेत ते अजरामर राहतील, त्यांचं योगदान अजरामर असणार आहे हे विसरु नका. आज अजित पवारांनी सगळी हद्दच ओलांडली.' असं म्हणत आव्हाडांनी त्यांना उत्तर दिलं आहे.
 
जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की, 'आपली उंची ओळखा कुठे शरद पवार आणि कुठे तुम्ही? अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंह हे देखील नावं काढतात. लाज वाटते मला तुमच्या सोबत काम केल्याची आधी पण वाटतच होती. शरद पवार देशाचे नेते तुम्हाला महाराष्ट्रात कोण ओळखत नाही. ज्या कुटुंबाने तुम्हाला सर्व दिले, ज्या माऊलीने तुम्हाला सर्व दिले तिचं कुंकू कधी पुसलं जाईल याची आज तुम्ही वाट बघता असल घाणेरडं राजकारण महाराष्ट्राने कधी बघितलं नाही.'

हे वाचलं का?

    follow whatsapp