पुण्यातील भाजपच्या नाराजी नाट्यावर नितीन गडकरींनी काढला मार्ग, काय घडलं?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

nitin gadkari meet medha kulkarni internal strife in bjp chandrakant patil
nitin gadkari meet medha kulkarni internal strife in bjp chandrakant patil
social share
google news

पुण्याच्या चांदणी चौकात आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे उद्धाटन पार पडले. या उद्धाटनाच्या एक दिवस आधी पुणे भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला होता. पुण्याच्या भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी फेसबूकवर पोस्ट टाकून नाराजी व्यक्त करत, आपल्याला डावलण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे कार्यक्रमापुर्वी अंतर्गत धुसफुसाची चर्चा सुरु झाली होती. यावर आता नितीन गडकरी यांनी आज मेधा कुलकर्णी यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दुर केल्याचे समजते आहे. (nitin gadkari meet medha kulkarni internal strife in bjp chandrakant patil)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज चांदणी चौकातील उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह चंद्रकांत पाटील, मेधा कुलकर्णी यांसह अनेक नेते उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर नितीन गडकरी यांनी थेट भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांचे घर गाठले होते. यावेळी गडकरी यांनी मेधा कुलकर्णी यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दुर करण्याचा प्रयत्न केला.

हे ही वाचा : Sana khan :’…नदीत फेकला मृतदेह’, भाजप पदाधिकारी हत्या प्रकरणाची Inside Story

नितीन गडकरी यांनी मेधा कुलकर्णी यांची समजूत काढली आहे. तसेच वरीष्ठांची भेट घेऊन विषय संपवण्याचा सल्ला दिला आहे. या भेटीनंतर मेधा कुलकर्णी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत त्या म्हणाल्या की, नितीन गडकरी घरी येऊन गेले याचा मला आनंद आहे. त्यांनी मला आशीर्वाद दिले आहेत. तसेच वरिष्ठ मला वेळ देणार आहे, त्यावेळेला मी वरिष्ठांशी बोलणार आहे. यापेक्षा जास्त मी काही बोलू शकत नाही, असे मेधा कुलकर्णी म्हणाल्या आहेत. एकूणच नितीन गडकरी यांनी मेधा कुलकर्णी यांची भेट घेतल्यानंतर त्यांची नाराजी काहिशी दुर झाल्याची चर्चा आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मेधा कुलकर्णींची फेसबुक पोस्ट

“माझ्यावरील कुरघोड्या, डावलणे याबद्दल मी कधी जाहीर वाच्यता केली नव्हती. विश्वासात न घेता अचानक निर्णय घेतले तेव्हाही, पण आता दुःख मावत नाही मनात. वाटले बोलावे तुमच्याशी… चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रके पहिली आणि खूप वाईट वाटले.”

“चांदणी चौक या विषयाचे सर्वस्वी श्रेय नितीन गडकरीजी आणि देवेंद्र फडणवीस यांना आहे. पण मुळातच त्यांच्याकडे हा विषय नेला कोणी? स्वतः आदरणीय गडकरीजी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात जाहीर भाषणात म्हणाले की, ‘तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी ताईंच्या सांगण्यावरून मी हा मुद्दा घेतला.”

ADVERTISEMENT

“अनेक असे संदर्भ देता येतील की ज्यात ‘कोथरूडचे आधुनिक कुठलेच नेते’ याविषयी सहभागी नव्हते, तेव्हापासून सतत पाठपुरावा केला होता. आता मात्र सर्व श्रेय एकट्याचेच असल्यासारखे वागणारे कोथरूडचे सदय नेते… माझ्या सारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का?”

ADVERTISEMENT

हे ही वाचा : शरद पवार अजित पवारांमध्ये पुण्यात गुप्त बैठक, भेटीमागचं कारण काय?

“मध्यंतरी आदरणीय मोदीजी, आदरणीय अमित शाहजी पुण्यात येऊन गेले. ठराविक लोकांना प्रोटोकॉल सोडून ‘सर्व ठिकाणी’चे पास होते. मी राष्ट्रीय पदावर असून, विनंती करूनही मला दिला नाही. साधे कोथरूडच्या मंडळ अध्यक्ष पदाच्या प्रक्रियेतही समाविष्ट श्रेणीमध्ये मी अपेक्षित नसेन तर याचा अर्थ स्थानिकांना मी नको आहे.”

“गेली अनेक वर्षे मी हे सहन करीत आहे. त्या त्या वेळी गोष्टी वरिष्ठांपुढे मांडल्या आहेत. देशापुढील आव्हाने, त्यासाठी करायचे अपेक्षित संघटन सोडून, तसेच मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी एकदिलाने कार्य करायचे सोडून, हे स्वतःच्या स्वार्थासाठी विघटनाचे, काटाकाटीचे राजकारण करत आहेत. माझ्यासारख्या निष्ठावान कार्यकर्तीला जाणीव झाली की माझी काही किंमत नाही आहे.”

“माझ्याबाबत त्यांना असे करणे सोपे जाते. माझ्याकडे ना मसल पॉवर, ना मनी पॉवर. मी एका सामान्य कुटुंबातून आलेली, विचारधारा धरून निष्ठेने काम करणारी कार्यकर्ती आहे. एका वैचारिकतेतून राजकारणात प्रवेश केला. आणि अगदी मनापासून सर्व समाजातील लोकांची कामे केली. आजही जे सोपवले आहे ते करीतच आहे. त्यावर असा बोळा फिरवला जातो आहे हे आता मात्र असह्य होऊन गेले आहे.”

    follow whatsapp

    ADVERTISEMENT