Nitish Kumar : अमित शाहांची भेट अन् 50 दिवसांत असं बदललं बिहारचं राजकारण, Inside Story
18 महिन्यांत नितीश कुमारांनी आपली भूमिका बदलल्याचे दिसत आहे. त्यांचा पक्ष जेडीयू कधीही आरजेडीसोबतची युती तोडून पुन्हा एनडीएमध्ये सामील होऊ शकतो आणि बिहारमध्ये पुन्हा एकदा जेडीयू-भाजप युतीचे सरकार स्थापन होऊ शकते.
ADVERTISEMENT

Nitish Kumar Marathi : राजकीय भूकंपाचे हादरे आणि बिहारचं राजकारण हे आता समीकरण बनलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या उत्तर भारतातील या राज्यात सातत्याने राजकीय उलथापालथ होत आहे. हे ज्या ज्या वेळी घडतं, त्यावेळी एक नाव हमखास असतं आणि ते म्हणजे नितीश कुमार यांचं!
लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत आल्यानंतर नितीश कुमारांनी मरेन पण भाजपसोबत जाणार नाही, असं म्हटलं. तर अमित शाहांनी जाहीर सभेत सांगितलं की, नितीश कुमारांसाठी आमचे दरवाजे कायमचे बंद झालेत. पण, या गोष्टींचा विसर पडण्याआधीच बिहारमध्ये राजकीय भूकंपाची चाहूल लागली. नितीश कुमार भूमिका बदलतील असंही कुणालाही वाटलं नव्हतं मात्र आता तसंच घडताना दिसत आहे. अमित शाह आणि नितीश कुमार यांची भेट झाली आणि 50 दिवसांत बिहारचे राजकारण बदलले… नेमकं काय घडलं?\
बिहारच्या राजकारणात मागील 50 दिवस खूप महत्त्वाचे ठरले आहेत. त्यामुळे येथील राजकारण पूर्णपणे बदलून गेलं आहे. भाजपसोबत जाणार नाही, असं म्हणणारे नितीश कुमार कोणत्याही क्षणी राजदची साथ सोडून भाजपसोबत जाण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे बिहारमधील सत्तेत पुन्हा एकदा भाजपची घरवापसी झालेली बघायला मिळेल.
बिहारच्या राजकारणाचं नितीश कुमार केंद्र
राजद-जदयूचं सरकार कोणत्याही क्षणी कोसळेलं असं सांगितलं जात आहे. नितीश कुमारांची बिहारच्या राजकारणात ताकद कमी होत चाललीये. असं असलं तरी ते ज्या पक्षासोबत वा आघाडीसोबत असतात, तिला जास्त फायदा होताना दिसून आलेला आहे. त्याचं कारण म्हणजे नितीश कुमारांशी एकनिष्ठ असलेला मतदार.










