शरद पवारांच्या कानमंत्रानंतर राहुल गांधी घेणार उद्धव ठाकरेंची भेट? ठिकाण “मातोश्री”

ADVERTISEMENT

Congress leader Rahul Gandhi and Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray will meet matoshree
Congress leader Rahul Gandhi and Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray will meet matoshree
social share
google news

Rahul Gandhi – Uddhav Thackeray : 

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट होणार असल्याची माहिती आहे. या भेटीसाठी स्वतः राहुल गांधी (Rahul Gandhi) मुंबईत येणार असून ‘मातोश्री’ बंगल्यावर ही भेट होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. गांधी-ठाकरे यांच्या भेटीची तारीख अद्याप निश्चित झालेली नसली तरीही या भेटीतून वीर सावरकर वादानंतर एक प्रकारे काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यातील डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न असल्याचही बोललं जातं आहे. (On the advice of Sharad Pawar, Congress leader Rahul Gandhi and Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray will meet)

राहुल गांधी यांनी नुकतीच जनता दल (संयुक्त)चे प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, राजदचे नेते तेजस्वी यादव यांची भेट घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्यात बैठक पार पाडली. यावेळी माध्यमांशी बोलताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, मला आनंद आहे की शरद पवार मुंबईहून भेटण्यासाठी आले आणि मार्गदर्शन केलं. काल राहुल गांधी यांनी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांची भेट घेतली. आमचं हेच मत आहे की, सगळ्यांना भेटून, बोलून, एकत्र येऊन पुढे जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. देशाच्या हितासाठी सगळ्यांना भेटणं गरजेचं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदेंचा ‘तो’ किस्सा आदित्य ठाकरेंनी सांगितला जसाचा तसा..

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार म्हणाले, मल्लिकार्जून खर्गे यांनी जे सांगितली तोच आमचा विचार आहे. पण नुसता विचार करून चालणार नाही. एक प्रक्रिया सुरू करणं गरजेचं आहे. ही फक्त सुरुवात आहे. यानंतर, इतर महत्त्वाच्या विरोधी पक्षांशी चर्चा केली जाईल. मग ममता बॅनर्जी असोत, अरविंद केजरीवाल असोत किंवा इतर. सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा व्हायला हवी. त्यांना प्रक्रियेत सामावून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. विरोधकांना एकत्र करण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाऊ, असे ते म्हणाले.

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तुम्ही दिलेले संविधान जिवंत आहे काय?’, शिवसेनेचा (UBT) PM मोदींवर थेट वार

दरम्यान, या कानमंत्रानुसार राहुल गांधी आता मुंबईत येवून ठाकरेंची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. याशिवाय राहुल गांधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, राहुल गांधी यांचा भेट घेण्याचा अजून प्रोग्रॅम आला नाही. पण भाजप विरोधातील सगळे लोक एकत्र येत आहे. नितीश कुमार यांना संयोजक करण्यात आलेलं आहे. भाजप विरोधात मोट बांधण्याचं काम सुरू आहे. भाजप विरोधी राजकीय दलांना एकत्र आणण्याचा काम काँग्रेस करत आहे. देश वाचविण्याच काम काँग्रेस करत आहे.

ADVERTISEMENT

यापूर्वी कधी झाली ठाकरे -गांधींच्या भेटी ?

  • २७ नोव्हेंबर २०१९
    आदित्य ठाकरें सोनिया गांधींच्या भेटीला
    ठिकाण – दिल्ली
  • २१ फेब्रुवारी २०२०
    ठाकरे आणि गांधी कुटुंबीयांमध्ये भेट
    ठिकाण – दिल्ली
  • ११ नोव्हेंबर २०२२
    आदित्य ठाकरे राहुल गांधी भेट
    ठिकाण – भारत जोडो यात्रा, महाराष्ट्र

    follow whatsapp

    ADVERTISEMENT