खऱ्या अर्थानं आज माझ्या पतीला श्रद्धांजली अर्पण, भारताच्या हल्ल्यानंतर शुभम द्विवेदींच्या पत्नीची प्रतिक्रिया
Operation Sindoor : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममधील झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात 7 मे 2025 रोजी मध्यरात्री भारताने पाकड्यांवर एअर स्ट्राईक हल्ला केला. यानंतर आता पहलगाम हल्ल्यात मृत पावलेल्या उत्तर प्रदेशातील कानपूरमधील शुभम द्वेवेदीच्या पत्नीनं पहिली प्रतिक्रिया दिलीय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

भारताने पाकड्यांवर एअर स्ट्राईक हल्ला केला.

यामध्ये एकूण 9 ठिकाणांवर हल्ला केला.

पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या शुभम द्विवेदीच्या पत्नीची प्रतिक्रिया
Operation Sindoor : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममधील झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात 7 मे 2025 रोजी मध्यरात्री 2 beple भारताने पाकड्यांवर एअर स्ट्राईक हल्ला केला. यामध्ये एकूण 9 ठिकाणांवर हल्ला केला. त्याच प्रामुख्यानं पाकव्याप्त काश्मीरचा भाग आहे. ही अधिकृत माहिती भारतानं मित्रदेशांना दिलीय. यानंतर आता पहलगाम हल्ल्यात मृत पावलेल्या उत्तर प्रदेशातील कानपूरमधील शुभम द्वेवेदीच्या पत्नीनं पहिली प्रतिक्रिया दिलीय.
हेही वाचा : भारताने या ऑपरेशनला 'सिंदूर' असं नाव का दिलं? त्यामागचा अर्थ काय?
हल्ल्यानंतर शुभम द्वेवेचीच्या पत्नीची प्रतिक्रिया
विवाहाला काही दिवस झाले होते आणि शुभम द्विवेदी आणि त्याच्या पत्नीनं काश्मीरातील पहलगाममध्ये हनीमूनसाठी गेले होते. त्यावेळी काही आतंकवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यात शुभमवर हल्ला करण्यात आला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. अशातच पत्नी एशन्यानं एका संस्थेला प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली की, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मी आभारी आहे. दहशतवाद्यांनी माझ्या पतीची हत्या केली. त्याचा बदला घेण्यात आला आहे. ही खरी श्रद्धांजली असल्याचं बोललं जातंय. शुभम आज जिथं कुठं आहे त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली असेलच. मी नरेंद्र मोदींना धन्यवाद म्हणू इच्छिते, अशी प्रतिक्रिया तिनं दिली.
हेही वाचा : जिथे एअर स्ट्राईक केला, ते ठीकाण का निवडलं, 'मरकज सुभान अल्लाह'मध्ये नेमकं काय? A टू Z स्टोरी