पंतप्रधानांसमोर झुकले, जुनी परंपराही मोडली, मोदींसाठी देशाने ‘हा’ नियम मोडला

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

papua new guineas james marape touched pm modi feet and changed its rules to accord exceptional ceremonial
papua new guineas james marape touched pm modi feet and changed its rules to accord exceptional ceremonial
social share
google news

Pm Narendra Modi Reached Papua new Guinea : जपानमध्ये पार पडलेल्या G-7 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) सहभागी झाले होते. या परीषदेनंतर आज पंतप्रधान मोदी यांनी पापुआ न्यु गिनी (Papua new Guinea) देशाला भेट दिली.या भेटीत नरेंद्र मोदी यांचे जंगी स्वागत करण्यात आले होते. अक्षऱश: पापुआ न्यू गिनीच्या देशाचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी नरेंद्र मोदी यांचे चरण स्पर्श केले होते. अशाप्रकारे मोदी यांचे जंगी स्वागत झालं. दरम्यान एवढचं नाही तर या देशाने नरेंद्र मोदी यांच्यासाठी त्यांची जुनी परंपरा देखील मोडली होती. ही परंपरा नेमकी काय होती? हे जाणून घेऊयात. (papua new guineas james marape touched pm modi feet and changed its rules to accord exceptional ceremonial)

ADVERTISEMENT

जुनी परंपरा काय?

प्रशांत महासागरात स्थित हा बेट, देश रात्रीच्या वेळी परदेशी पाहुण्यांचे स्वागत करत नाही. या देशांमध्ये पापुआ न्यू गिनी देशाचा समावेश होतो. पापुआ न्यू गिनी देशात असा नियम आहे की, सूर्यास्तानंतर तेथे आलेल्या कोणत्याही नेत्याचे औपचारिक स्वागत केले जात नाही. परंतू पंतप्रधान मोदींचे (Pm Narendra Modi) भव्य स्वागत करण्यात आले होते. त्यामुळे पापुआ न्यू गिनी देशासाठी पंतप्रधान मोदी हे पहिले व्यक्ती ठरले आहेत, ज्यांच्यासाठी या देशाने आपली जुनी परंपरा मोडून काढली आहे.

हे ही वाचा : सुषमा अंधारेंना राज ठाकरे स्टाईल अंगलट? मिटकरी भडकले, थेट ठाकरेंकडे तक्रार

मोदींसाठीच का परंपरा मोडली?

पापुआ न्यू गिनी देशात आतापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली आहे. पण फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) हे पहिले असे नेते ठऱले आहेत, ज्याच्या स्वागतासाठी देशाने जुनी परंपरा मोडली होती. पण ती परंपरा का मोडली असा सवाल आता उपस्थित होत आहे. तर याचे उत्तर असे आहे की, जगातील वाढते भारताचे महत्त्व आणि जागतिक स्तरावरील पीएम मोदींची वाढती विश्वासार्हता लक्षात घेऊन तेथील सरकारने हा निर्णय घेतला होता.

हे वाचलं का?

दरम्यान पापुआ न्यू गिनीमध्ये स्थायिक झालेल्या भारतीय नागरीकांनी देखील पंतप्रधान मोदींचे (Pm Narendra Modi) स्वागत केले. पंतप्रधानांनी येथे पोहोचून अनेकांची भेट घेतली. अनेक भारतीयांनी पंतप्रधान मोदींना भेटवस्तू देखील दिल्या. तसेच पीएम मोदींसोबत फोटो काढण्यासाठीही अनेकजण उत्सुक होते.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : सुषमा अंधारेंचा ‘लाव रे तो व्हिडिओ’, थेट पंतप्रधान मोंदींवर चढवला हल्ला

पंतप्रधान मोदी (Pm Narendra Modi) फोरम फॉर इंडिया-पॅसिफिक कॉर्पोरेशन (FIPIC) शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी येथे आले आहेत. या बैठकीत 14 देशांचे नेते सहभागी होणार आहेत. पापुआ न्यू गिनीला भेट दिल्यानंतर पंतप्रधान मोदी येथून थेट ऑस्ट्रेलियाला जाणार आहेत. तेथे तो अनेक कार्यक्रमात सहभागी होणार आहे. आतापासून ऑस्ट्रेलियात हॅरिस पार्क परिसर ‘लिटिल इंडिया’ म्हणून ओळखला जाईल. पंतप्रधानांच्या सामुदायिक कार्यक्रमादरम्यान याची घोषणा केली जाईल.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT