Rahul Gandhi : सात गोष्टींसाठी राहुल गांधींची भूमिका महत्त्वाची, मोदींना घ्यावी लागणार संमती
Rahul Gandhi role as Opposition Leader : १८व्या लोकसभेत विरोधी पक्षनेता असणार आहे. काँग्रेसचे राहुल गांधी विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत असणार असून, पंतप्रधान मोदींना त्यांना विश्वासात घेऊन काही निर्णय घ्यावे लागणार आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

राहुल गांधी विरोधी पक्षनेता म्हणून ठेवणार मोदी सरकारच्या कारभारावर नजर

सरकारसाठी विरोधी पक्षनेत्यांची भूमिका महत्त्वाची

अनेक नियुक्त्यांसाठी राहुल गांधींची भूमिका महत्त्वाची
Rahul Gandhi Opposition Leader : काँग्रेसने उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघाचे खासदार राहुल गांधी (54 वर्षे) यांची लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड केली. मंगळवारी रात्री इंडिया आघाडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर काँग्रेस संसदीय मंडळाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रोटेम स्पीकर भर्तृहरी महताब यांना पत्र लिहून या निर्णयाची माहिती दिली. बुधवारी राहुल गांधींनी सभागृहात जबाबदारीही घेतली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या नियुक्तीनंतर ते औपचारिक प्रक्रियेचा भागही बनले. (Rahul Gandhi will now have a role in the appointment to these key posts)
विरोधी पक्षनेता बनल्यामुळे राहुल गांधींना आता कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळाला आहे. यामुळे प्रोटोकॉल यादीतील त्यांचे स्थान देखील वाढेल आणि विरोधी आघाडीच्या पंतप्रधान चेहऱ्यासाठी ते नैसर्गिक दावेदार देखील असू शकतात.
अडीच दशकांहून अधिक काळापासून सक्रीय राजकारणात असलेल्या राहुल गांधींकडे पहिल्यांदाच घटनात्मक पद आले आहे. राहुल हे पाचव्यांदा खासदार बनले असू, मंगळवारी त्यांनी हातात संविधानाची प्रत घेऊन पदाची शपथ घेतली.
राहुल गांधी रायबरेलीतून आले निवडून
लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेलीमधून अशा दोन मतदारसंघातून विजयी झाले. त्यांनी वायनाड मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा दिला आहे.
हेही वाचा >> आदित्य ठाकरेंसाठी धोक्याची घंटा, वरळीची जागा धोक्यात?
आता वायनाडमध्ये पोटनिवडणूक होणार असून राहुल गांधी यांची बहीण प्रियांका गांधी वढेरा या निवडणूक लढवणार आहेत. राहुल गांधी यांनी 2004 मध्ये राजकारणात प्रवेश केला आणि पहिल्यांदाच उत्तर प्रदेशातील अमेठीमधून विजय मिळवला होता. त्यांनी अमेठीतून तीन वेळा निवडणूक जिंकली. 2019 मध्ये ते अमेठीतून पराभूत झाले, तर वायनाडमधून जिंकले होते.