PM Modi in Pune : शरद पवारांसमोर PM मोदींचे विरोधकांना खडेबोल, काय म्हणाले?
पुण्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलताना नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना सुनावले आहे.एखाद्या रस्त्याच नाव बदललं की विरोधक आता गोंधळ घालतात, अशा शब्दात मोदी यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले आहे
ADVERTISEMENT
पुण्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलताना नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना सुनावले आहे.एखाद्या रस्त्याच नाव बदललं की विरोधक गोंधळ घालतात, अशा शब्दात मोदी यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.(pm narendra modi criticize opposition on lokamanya tilak national award event punee sharad pawar)
ADVERTISEMENT
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमातील भाषणाची सुरुवातच मराठीतून केली होती. महाराष्ट्राच्या भूमीला कोटी कोटी वंदन…पुण्याच्या पवित्र भूमीवर आणि महाराष्ट्राच्या धरतीवर येण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला म्हटले. शिवराय, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, टिळकांची ही भूमी आहे. महाराष्ट्राच्या या भूमीवर मला जो सन्मान मिळाला आहे, हा माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव असल्याचे मोदी यांनी सांगितले.
हे ही वाचा : PM Modi in Pune : ‘सर्जिकल स्ट्राईक’… शरद पवारांनी मोदींना कोणता इतिहास सांगितला?
टिळकांचे गुजरातशी खास कनेक्शन
नरेंद्र मोदी यांनी टिळकांचा गुजरातशी खास कनेक्शन असलेला किस्साही सांगितला आहे. स्वातंत्र्य संग्रामता लोकमान्य टिळक दीड महिने साबरमती तूरूंगात राहिले. अहमदाबादमध्ये त्यांना ऐकायला 40 हजार नागरीक आले होते. यामध्ये सरदार वल्लभबाई पटेल देखील होते. तसेच इग्रजांनी राणी व्हिक्टोरीयाच्या जंयतीसाठी अहमदाबादमध्ये 1897 मध्ये व्हिक्टोरीया गार्डन बनवलं होतं. ब्रिटीश महाराणीच्या नावाने बनवलेल्या या पार्कमध्ये सरदार पटेल यांनी लोकमान्य टिळकांची मुर्ती स्थापन करण्याचा निर्णय़ घेतला होता. या दरम्यान सरदार पटेलांवर खूपच दबाव टाकण्यात आला, त्यांना थांबण्याचा प्रयत्न झाला. पण सरदार सरदार होते, मी माझे पद सोडून देईन पण मुर्ती तिकडेच स्थापण करणार अशी त्यांनी भूमिका घेतली. अखेर मुर्ती बनली आणि 1929 मध्ये त्याचे लोकापर्ण महात्मा गांधी यांच्या हस्ते करण्यात आल्याचा किस्सा मोदी यांनी सांगितला.
हे वाचलं का?
गुलामीच्या काळातही सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या सुपुत्राच्या सन्मानासाठी इंग्रजांना आव्हान दिले होते. पण आजची स्थिता पाहिली तर विदेशी व्यक्तीचे नाव भारतीय भूमीवर ठेवलं, तर काही लोक त्याचा विरोध करू लागतात. त्यांची झोप उडते, असा चिमटा नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना काढला होता.
हे ही वाचा : Narendra Modi Pune visit :शरद पवार एकटेच बसले, मोदी पुण्यात आल्यानंतर काय घडलं?
मोदींची मोठी घोषणा?
टिळकांशी जी संस्था जोडली गेली आहे, त्या संस्थेद्वारे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार मिळणे, हे माझे भाग्य आहे आणि माझ्यासाठी हा अविस्मरणीय क्षण आहे. त्यामुळे हा पुरस्कार मी देशातील 140 करोड जनतेला समर्पित करतो असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.तसेच या पुरस्कारासह जी रोख रक्कम मला मिळाली आहे. ती रक्कम मी गंगेला समर्पित करत आहे. पुरस्काराची रोख रक्कम मी नमामी गंगे योजनेसाठी दान करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा देखील पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT