Congress मध्ये भूकंप... चव्हाणांनंतर देशमुख-शिंदेही देणार काँग्रेसला धक्का?, बावनकुळेंचं मोठं विधान
Ashok Chavan: काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी असं विधान केलं आहे की, लातूर आणि सोलापूरमधून देखील काही नेते भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत.
ADVERTISEMENT
Sushil Kumar Shinde and Amit Deshmukh: मुंबई: काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेस पक्षाला देखील सोडचिठ्ठी दिली आहे. यामुळे आता काँग्रेसला महाराष्ट्रात मोठा हादरा बसला आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते मिलिंद देवरा, बाबा सिद्दिकी यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. असं असताना आता सोलापूर आणि लातूरमधून देखील काँग्रेसला धक्का बसणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. (political earthquake in congress after ashok chavan will deshmukh and shinde also give a shock to congress chandrashekhar bawankule big statement on solapur lautr)
ADVERTISEMENT
या सगळ्या घडामोडी सुरू असतानाचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी विधानं केली आहेत त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
कारण नुकतंच अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला असताना दुसरीकडे सोलापूर आणि लातूरमध्ये देखील काँग्रेसला धक्का बसू शकतो असं भाकितच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वर्तवलं आहे.
हे वाचलं का?
अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचे अनेक बडे नेते हे भाजपच्या संपर्कात असून ते देखील लवकरच काँग्रेसला रामराम करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. यामध्ये सोलापूरचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे तसेच लातूरचे आमदार आणि माजी मंत्री अमित देशमुख हे दोन नेतेही भाजपच्या वाटेवर असल्याचं सातत्याने बोललं जात आहे. अशातच आता चंद्रशेखर बावनकुळे केलेल्या आजच्या विधानाने या चर्चेला अधिक बळ मिळालं आहे.
'सोलापूर-लातूरमधून लोकं भाजपमध्ये करणार पक्ष प्रवेश'
अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, 'उद्या 13 तारखेला मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश आहेत मुंबईत. काही नाशिकचे पक्षप्रवेश आहेत. तसंच सोलापूरवरून लोकं येत आहेत. लातूरवरून देखील मोठ्या प्रमाणावर लोकं येत आहेत.' असं विधान त्यांनी केलं आहे.
ADVERTISEMENT
आगे आगे देखो.. होता है क्या.. - फडणवीस
दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं विधान केलं की, 'काँग्रेसमधील अनेक चांगले नेते भाजपच्या संपर्कात आहेत. ज्या प्रकारे काँग्रेस पक्ष गेल्या काही वर्षात वाटचाल करतोय त्यातील ज्यांचा जनतेशी कनेक्ट आहे अशा लोकांची त्या ठिकाणी घुसमट होते आहे. म्हणून देशभरात हा ट्रेंड पाहायला मिळतोय की, जनतेचे लोकं हे भाजपमध्ये प्रवेश करतायेत. त्यामुळे निश्चितपणे मोठे नेते हे भाजपमध्ये येतील हा मला विश्वास आहे. आज मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो की, आगे आगे देखो.. होता है क्या..' असं ते म्हणाले.
ADVERTISEMENT
दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या निर्णयानंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने पुन्हा एकदा ऑपरेशन लोट्स महाराष्ट्रात सुरू केल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसमधून भाजपमध्ये जाणाऱ्यांची यादी वाढण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT