‘ठाकरे, आव्हाड रोशनी शिंदेंचा जीवही घेऊ शकतात’, मिनाक्षी शिंदेंच्या पत्राने खळबळ
ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना पोलीस सुरक्षा देण्याची मागणी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मिनाक्षी शिंदे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली.
ADVERTISEMENT

ठाणे: ठाकरे गटातील महिला कार्यकर्ता रोशनी शिंदे यांच्या मारहाण प्रकरणाला नवं मिळालं आहे. रोशनी शिंदे यांच्या जिवाला धोका असून, त्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी शिवसेनेच्या शिंदे गटाने केली आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, खासदार राजन विचारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गंभीर आरोप शिवसेना महिला आघाडीच्या ठाणे जिल्हाप्रमुख मिनाक्षी शिंदे यांनी केला आहे.
रोशनी शिंदे मारहाण प्रकरणाने ठाण्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. ठाकरे गटाच्या युवती सेनेच्या महिला कार्यकर्त्याला शिवसेनेच्या म्हणजे शिंदे गटाच्या महिलांनी मारहाण केली. या महिलेला उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे.
हेही वाचा >> ‘बावन’ आणे, कमळबाई आणि शिंदेंचे शाप; शिवसेनेचा (UBT) भाजपवर घणाघात
दरम्यान, ठाकरे गट आणि शिवसेनेत यावरून घमासान सुरू असतानाच आता शिवसेनेच्या मिक्षानी शिंदे यांनी रोशनी शिंदे यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. मिनाक्षी शिंदे यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांना तसे पत्र दिले आहे.
उद्धव ठाकरे, जितेंद्र आव्हाडांचा उल्लेख, पत्रात काय म्हटलंय?
मिनाक्षी शिंदे यांनी पत्रात म्हटलं आहे की, “दोन दिवसांपासून ठाण्यात रोशनी शिंदे पवार या महिलेवरून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून, त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील नेत्यांकडून होत आहे.”