असं काय घडलं की, राहुल गांधींनी ‘फ्लाइंग किस’ दिला? लोकसभेत झाला प्रचंड गोंधळ
राहुल गांधींनी लोकसभेतून बाहेर जाताना महिला खासदारांना फ्लाईंग किस दिला, असा आरोप स्मृती इराणी यांनी केला.
ADVERTISEMENT

Rahul Gandhi flying kiss : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर भाषण केले. मात्र त्यांच्या भाषणानंतर एका वादाने डोके वर काढले. कारण केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर महिला खासदारांना फ्लाइंग किस दिल्याचा आरोप केला आहे. हे प्रकरण इतक्यावरच थांबलं नाही, तर भाजपच्या महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे तक्रारही केली. त्यामुळे लोकसभेत नेमकं काय घडलं की राहुल गांधींनी संसदेत फ्लाइंग किस दिला? (what happened that Rahul Gandhi gave Flying Kiss in the Parliament?)
तर झालं असं की बुधवारी (9 ऑगस्ट) लोकसभेत अविश्वास ठरावावर दुसऱ्या दिवशीही चर्चा सुरू होती. यावर बोलण्यासाठी राहुल गांधीही सभागृहात पोहोचले. भाषण संपल्यानंतर ते सभागृहातून बाहेर पडत असताना त्यांचे काही कागदपत्रं जमिनीवर पडले.
राहुल गांधी फ्लाईंग किस… लोकसभेत काय घडलं?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी हे कागदपत्रं उचलण्यासाठी खाली वाकले, तेव्हा भाजप खासदार हसायला लागले. त्यानंतर राहुल गांधींनी ट्रेझरी बेंचकडे फ्लाइंग किस दिला आणि हसत निघून गेले.
वाचा >> Rahul Gandhi: ‘रावणाप्रमाणेच मोदीजी सुद्धा दोन जणांचं…’, राहुल गांधींनी मोदींना भयंकर डिवचलं!
दरम्यान, ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली नाही. पण, तिथे उपस्थित लोकांच्या म्हणण्यानुसार हा सर्व प्रकार त्यांच्या डोळ्यासमोर घडला. त्यावेळी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे भाषण सुरू होते. भाषणादरम्यान ही बाब त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि यावर सभागृहात भाष्य केले.